एक्स्प्लोर

Deool Band 2 Pravin Tarde On Riteish Deshmukh: 'देऊळ बंद 2'ने राजा शिवाजीचा रेकॉर्ड मोडू नये; प्रविण तरडे अन् रितेश देशमुख यांच्यातील 'त्या ' फोनकॉलची एकच चर्चा

'देऊळ बंद 2 ' चित्रपट पुढे जातोय हे कळल्यानंतर अभिनेते व दिग्दर्शक रितेश देशमुख यांचा आवर्जून फोन आल्याचेही प्रवीण तरडे यांनी सांगितलं.

Deool Band 2 Pravin Tarde: मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) चित्रपटाची प्रचंड चर्चा सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर महिन्याभरातच या चित्रपटाने 90 कोटींचा टप्पा पार केला असून 100 कोटींच्या कलेक्शनपासून शेवटच्या टप्प्यावर हा चित्रपट उभा आहे. दुसरीकडे मराठी सिनेमाच्या इतिहासात लवकरच 'देऊळ बंद 2' नवा इतिहास रचेल. मात्र, 'या सिनेमाने राजा शिवाजीचा रेकॉर्ड मोडू नये ' असं देऊळ बंद चे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी म्हटलं. असं म्हणण्यामागचं कारणही त्यांनी सांगितलं. 'देऊळ बंद 2 ' चित्रपट पुढे जातोय हे कळल्यानंतर अभिनेते व दिग्दर्शक रितेश देशमुख यांचा आवर्जून फोन आल्याचेही प्रवीण तरडे यांनी सांगितलं.  या फोन कॉलची सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे.

काय म्हणाले प्रवीण तरडे ?

 प्रवीण तरडे म्हणाले " माझा सिनेमा कितीही मोठा झाला तरी या सिनेमानं 'राजा शिवाजी' चा रेकॉर्ड मोडू नये असं मला वाटतं. कारण तो छत्रपती शिवाजी महाराजांवरचा सिनेमा आहे.रितेश खूप चांगला माणूस आहे.रितेश आणि जेनेलिया किती सुंदर कपल आहे हे सगळ्यांनाच माहिती.मराठी माणसाचा झेंडा त्यांनी रोवला आहे.या दोघांचंही मी कौतुक सांगतो. 'राजा शिवाजी' सिनेमा हाउसफुल सुरू होता. आणि त्यातच 'देऊळ बंद 2 ' सिनेमा आला. 'देऊळ बंद 2' ने आठवड्याभरातच धडाधड थिएटर कॅप्चर केले. 11 दिवसातच आपण 50 कोटी कमावले. पण पहिला फोन मला रितेश देशमुख सरांचा आला." असं प्रवीण तरडे यांनी सांगितलं. 'प्लॅनेट मराठी'शी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, "त्यांनी माझं खास अभिनंदन केलं. ते म्हणाले 'की मला खूप बरं वाटतंय. एक मराठी सिनेमा दुसऱ्या मराठी सिनेमाला मागे टाकून पुढे चालला आहे. तुम्ही माझ्या पुढे जा.दोन आठवड्यांनी तुमच्यापुढे कोणीतरी जाईल.मग त्याच्यापुढे कोणीतरी जाईल.आपण एकमेकांमध्ये स्पर्धा करू आणि मराठी सिनेमा मोठा करू .' ही किती सुंदर भावना आहे.त्यामुळे रितेश देशमुख असो नागराज मंजुळे असो किंवा प्रवीण तरडे.मराठी सिनेमा मोठा झाला पाहिजे.फक्त देऊळ बंद 2 चित्रपटाविषयी मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की, राजा शिवाजी किंवा सैराट सिनेमाच्या मागे चॅनल होतं. मार्केटिंग टीम होती. 'देऊळ बंद 2' च्या मागे कोणीही नव्हतं. असं प्रवीण तरडे यांनी सांगितलं.

'देऊळ बंद 2' चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

'देऊळ बंद 2' या चित्रपटाने जगभरातून 84.94 कोटी रुपयांचं कलेक्शन करत बॉक्स ऑफिस हादरवून टाकलं आहे. फक्त 32 दिवसात या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस परदेशातील कलेक्शन तसेच तंबूशोमधून मिळालेले कलेक्शन 93.50 कोटी रुपये झाले आहे. दोन दिवसांपूर्वी, दिग्दर्शक व लेखक प्रवीण तरडे यांनी चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयीची एक पोस्ट केली होती. यात त्यांनी म्हटलेलं 'मित्रांनो नागराज च्या सैराटने घडलेल्या रस्त्यावरून रितेश राजा शिवाजी घेऊन डौलात निघाला.त्याच्या मागोमाग आपला देऊळ बंद २ घेऊन मी १०० च्या शेवटच्या टप्प्यावर आलोय. खूप अवघड होतं सगळं, पण तुमच्या आणि स्वामींच्या जीवावर शक्य झालं.मराठी सिनेमा मोठा होतोय.लवकरच मराठी सिनेमाचं तिसरं शतक साजरं करू' असं त्यांनी म्हटलेलं.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget