एक्स्प्लोर

Deool Band 2: 'देऊळ बंद 2' सिनेमाचा दबदबा कायम; चौथ्या आठवड्यातही सिनेमागृहात प्रेक्षकांची गर्दी, शनिवारी किती कोटी कमावले?

Deool Band 2 Box Office Collection: 'देऊळ बंद 2' सिनेमानं 24 व्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन केले?

Deool Band 2 Box Office Collection Day 24: 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2' सारख्या सिनेमांना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर, मराठी चित्रपटसृष्टीला सुगीचे दिवस आले आहेत, असं म्हटलं तर, वावगं ठरणार नाही. 'राजा शिवाजी' या सुपरहिट ऐतिहासिक सिनेमानंतर 'देऊळ बंद 2' या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला.  'देऊळ बंद 2' या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली.  'देऊळ बंद 2' हा सिनेमा 21 मे 2026 रोजी रिलीज झाला. अवघ्या 23 दिवसांत या सिनेमानं कोट्यवधींच्या घरात कमाई करुन प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं. चौथ्या आठवड्यातही या सिनेमानं उत्तम कामगिरी केली आहे.  दरम्यान, 24 व्या दिवशी या सिनेमानं नेमकं किती कोटींचे कलेक्शन केले?  चौथ्या शनिवारी या सिनेमानं किती कोटींचा गल्ला जमवला? जाणून घेऊयात.

देऊळ बंद 2 सिनेमानं चौथ्या आठवड्यात किती कोटींचे कलेक्शन केले? ( Day 24 Deool Band 2 Box Office Collection)

23 दिवसांनंतरही 'देऊळ बंद 2' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करताना दिसत आहे. 23 व्या दिवशी म्हणजेच चौथ्या शुक्रवारी या सिनेमानं 1.27 कोटींचे कलेक्शन केले. 725 शोजमधून या सिनेमानं कमाई केली.  तर,  24 व्या दिवशी म्हणजेच चौथ्या शनिवारी या सिनेमानं 1.40 कोटींचा गल्ला जमवला. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, 23 व्या दिवसाच्या तुलनेत 24 व्या दिवशी या सिनेमानं उत्तम कामगिरी केली आहे.  24 व्या दिवशी या सिनेमाचे 816 शोज पार पडले. 816 शोजमधून या सिनेमानं दमदार कमाई केली.

या सिनेमात मोहन जोशी आणि स्नेहल तरडे यांची मुख्य भूमिका आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणींवर आधारीत या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांच्या मनातील व्यथा या सिनेमात मांडण्यात आली आहे. त्यामुळे या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत ठेवली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतात या सिनेमानं आतापर्यंत 66.42 कोटींचे नेट कलेक्शन केले आहे.

'देऊळ बंद 2' सिनेमात मोहन जोशी यांची मुख्य भूमिका आहे.  तर, स्नेहल तरडे यांचीही मुख्य भूमिका आहे. यासह प्रसाद ओक, महेश मांजरेकर, मंगेश देसाई, संस्कृती बालगुडे, अनिरुद्ध दिंडोरकर आणि रमेश परदेशी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर ज्या पद्धतीने घौडदौड सुरू आहे, हा चित्रपट लवकरच 80 कोटींचा टप्पा ओलांडेल, यात शंका नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

प्रसिद्ध यूट्यूबर - इन्फ्ल्युएंसरला घरात घुसून संपवलं; मेहुण्यानेच साथीदारांसह रचला कट, कारण काय?

महत्त्वाच्या बातम्या

Pooja Birari Diwali : बांदेकरांच्या सुनेची लग्नानंतर पहिली दिवाळी, सासूबाईंच्या बेसनाच्या लाडवांचा अस्वाद अन् सोहमच्या गिफ्टची उत्सुकता; नव्या मालिकेचीही सुरुवात
बांदेकरांच्या सुनेची लग्नानंतर पहिली दिवाळी, सासूबाईंच्या बेसनाच्या लाडवांचा अस्वाद अन् सोहमच्या गिफ्टची उत्सुकता; नव्या मालिकेचीही सुरुवात
Maharashtrachi Hasyajatra Director Sachin Goswami: गौरव मोरे, ओंकार भोजने, विशाखा सुभेदार कोण सोडून गेल्यावर जास्त वाईट वाटलं? दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणाले...
गौरव मोरे, ओंकार भोजने, विशाखा सुभेदार कोण सोडून गेल्यावर जास्त वाईट वाटलं? दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणाले...
Harry Boxer : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणाचा सूत्रधार हॅरी बॉक्सरला अमेरिकेत अटक, दिल्ली पोलिसांच्या अपडेटनंतर बेड्या
बिश्नोई गँगचा गँगस्टर हॅरी बॉक्सरला अमेरिकेत अटक, रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबाराचा सूत्रधार ताब्यात
Deepika Chikhaliya On Ramayana: 'सीता पहिली सिंगल मदर...', 'रामायण' मालिकेत सीता मातेची भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीचं थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
'सीता पहिली सिंगल मदर...', 'रामायण' मालिकेत सीता मातेची भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीचं थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget