एक्स्प्लोर

Deool Band 2 Box Office Collection: 'देऊळ बंद 2'चा विकेंड ब्लास्ट! अवघ्या 4 दिवसांत चित्रपटगृहात प्रेक्षकांची झुंबड; आतापर्यंत किती कलेक्शन?

Deool Band 2 Box Office Collection: 21 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर  सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय.

Deool Band 2 Box Office Collection: प्रवीण तरडे लिखित व दिग्दर्शित 'देऊळ बंद 2 ' (Deool Band 2) चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. प्रदर्शनापूर्वीपासूनच या चित्रपटाची प्रचंड चर्चा होती. त्याचं कारणही तसंच होतं. 2015 ला प्रदर्शित झालेल्या 'देऊळ बंद ' या चित्रपटानंतर तब्बल 11 वर्षांनी पुन्हा एकदा स्वामी प्रेक्षकांसमोर आले आहेत. (Deool Band 2 Box Office Collection) पहिल्या भागाला महाराष्ट्रभरातून उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता दुसऱ्या भागाविषयी प्रचंड उत्सुकता होती. गुरुवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने शनिवार रविवारी चांगली कमाई केली असून चौथ्या दिवशी 5.90 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाला अवघ्या चार दिवसातच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. भारतभरातून या चित्रपटाने 18.59 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. 21 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर  सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय.

देऊळ बंद 2 चित्रपटाचे चार दिवसांचे कलेक्शन

प्रवीण तरडे दिग्दर्शित व लिखित देऊळ बंद 2 चित्रपटाने प्रदर्शनाची चौथ्या दिवशी 5.90 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं. शनिवारी 4.85 कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली होती. देशभरातील या चित्रपटाचे नेट कलेक्शन 15.75 कोटी रुपये झाले आहे. ग्रॉस कलेक्शन 18.59 कोटी नोंदवण्यात आले.शनिवारपेक्षा 21.6% ची वाढ या चित्रपटाच्या कमाईत रविवारी दिसली. रविवारी संध्याकाळच्या शोजला प्रेक्षकांनी सर्वाधिक गर्दी केली होती.  गुरुवारी प्रदर्शित झालेल्या देऊळ बंद 2 चित्रपटाचा विकेंड दमदार गेला. 

पहिल्या दिवशी -2.45 कोटी
दुसरा दिवस -2.55 कोटी
तिसरा दिवस -4.85 कोटी
चौथा दिवस -5.90 कोटी

महाराष्ट्रभरात या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. मुंबईत या चित्रपटाचे सर्वाधिक शो लागले असून पुणे ,नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि सांगलीमध्ये हा चित्रपट प्रेक्षक अधिक पाहत आहेत. रविवारी मुंबईमध्ये या चित्रपटाचे 540 शो  लागले होते. जवळपास 71.8% प्रेक्षक संख्येसह हा चित्रपट पाहिला गेला. पुण्यात 366 शोजमध्ये 79.8% प्रेक्षक संख्येने हा चित्रपट पाहिला गेला. 

प्रवीण तरडे दिग्दर्शित व लिखित देऊळ बंद 2 चित्रपटात मोहन जोशी यांनी स्वामी समर्थांची मुख्य भूमिका साकारली आहे. प्रसाद ओक मंगेश देसाई स्नेहल तरडे ओम भूतकर महेश मांजरेकर हे कलाकार ही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले आहेत. पहिला भागात राघव शास्त्रीची भूमिका करणाऱ्या गश्मीर महाजनी सुद्धा दुसऱ्या भागामध्ये झळकला आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांना देऊळ बंद पाहताना दिग्दर्शकाने सुखद धक्का दिला असून , या चित्रपटाचा तिसऱ्या भागाची घोषणाही करण्यात आली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Pooja Birari On Home Minister: 'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
Nana Patekar Death Bharti Achrekar: 'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
Kranti Redkar Controversy: मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
Salman Khan Youtube: सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार
सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Mukul Wasnik: कालपर्यंत ज्यांनी विविध राजकीय पक्षांना फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता स्वतःचे खासदार शाबूत ठेवावे लागतील: मुकुल वासनिक
राजकीय पक्ष फोडणाऱ्यांना स्वत:चे खासदार शाबूत ठेवाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, मुकुल वासनिक यांचा भाजपला टोला  
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
Ashutosh Ranka on PM Modi: आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट करुन टाकला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट केला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Panchayat Raj Abhiyan : पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
Abhijit Dipke Grandmother Death: आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
Embed widget