एक्स्प्लोर

Deool Band 2 Box Office collection: 'देऊळ बंद 2' चा 100 कोटींच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचला; बॉक्स ऑफिसचा कळस गाठायला अजून किती बाकी?

लवकरच मराठी सिनेमाचे तिसरे शतक साजरा करू. अशी पोस्ट करत प्रवीण तरडे यांनी देऊळ बंद 2 चित्रपटातून आत्तापर्यंत किती कलेक्शन झालं याविषयीची एक पोस्ट केली आहे. 

Deool Band 2 Box Office Collection: प्रविण तरडे लिखित व दिग्दर्शित ' देऊळ बंद 2' (Deool Band 2) सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) एकामागून एक विक्रम मोडत पुढे चालला आहे.  जगभरातून या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय.  चित्रपट प्रदर्शित होऊन महिना उलटून गेला तरी प्रेक्षक हा चित्रपट पहायला जात आहेत. दरम्यान, प्रेक्षकांच्या दमदार प्रतिसादात हा चित्रपट 100 कोटींचा टप्पा गाठण्यासाठी आता तयार झाला आहे. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार 33 दिवसांनंतर या चित्रपटाने जगभरातून 84.76 कोटींचा टप्पा गाठला आहे. 100 कोटींचं कलेक्शन करण्यासाठी या चित्रपटाला अवघ्या 15 कोटी रुपयांची गरज आहे. मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा हा चौथा चित्रपट ठरला आहे. दरम्यान, प्रविण तरडे यांनी यासंदर्भात एक पोस्टही केलीय.

'देऊळ बंद 2'  हा चित्रपट गेल्यांकही महिन्यांपासून चर्चेत आहे. 9 ते 10 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आलेल्या या चित्रपटाने भारतात आत्तापर्यंत 72.24 कोटी रुपयांची कमाई केली. 41,931 शोजमधून हा चित्रपट पाहिला गेला. 

प्रवीण तरडे यांची पोस्ट 

मित्रांनो नागराजाच्या सैराटने काढलेल्या रस्त्यावरून रितेश राजा शिवाजी घेऊन डौलात निघाला. त्याच्या मागोमाग आपला 'देऊळ बंद 2' घेऊन मी शंभरच्या शेवटच्या टप्प्यावर आलोय. खूप अवघड होतं सगळं पण स्वामींच्या आणि तुमच्या जीवावर शक्य झालं. मराठी सिनेमा मोठा होतोय. लवकरच मराठी सिनेमाचे तिसरे शतक साजरा करू. अशी पोस्ट करत प्रवीण तरडे यांनी देऊळ बंद 2 चित्रपटातून आत्तापर्यंत किती कलेक्शन झालं याविषयीची एक पोस्ट केली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pravin Vitthal Tarde (@pravinvitthaltarde)

त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त 32 दिवसात 88.20 कोटी रुपये कमावले. इतर देशांमध्ये 4.20 कोटी तर तंबू शोमधून 1.10कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे या चित्रपटाची एकूण कमाई 93.50 कोटी रुपये झाली आहे असं प्रवीण तरडे यांनी सांगितलं. 'देऊळ बंद 2 ' हिंदी चित्रपट जगभरात हाऊसफुल झाल्याचं ते म्हणाले. दरम्यान, हा 2026 मधील सर्वाधिक नफा कमावणारा मराठी चित्रपट ठरला आहे.‘देऊळ बंद 2’ हा 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या देऊळ बंद  या चित्रपटाचा सिक्वेल आहे. पहिला भागही त्या काळात मोठा हिट ठरला होता. आता त्याचा सिक्वेलही तितकाच यशस्वी ठरत असून प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Drishyam 3 Box Office: 'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
Sushil Inamdar Emotional Post After Visiting Nana Patekar House: मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर भावूक पोस्ट शेअर करुन म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
Lalit Prabhakar Sai Tamhankar Viral Photo: प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO
प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO
Jui Gogari on Navratri: 'नवरात्रीचे नऊ दिवसच नाही, तर प्रत्येक दिवस स्त्रियांचाच...'; स्त्रीशक्तीबाबत जुई गोगरीचं स्पष्ट मत
'नवरात्रीचे नऊ दिवसच नाही, तर प्रत्येक दिवस स्त्रियांचाच...'; स्त्रीशक्तीबाबत जुई गोगरीचं स्पष्ट मत

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
Harshvardhan Patil: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
Pune BJP Action: पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
MPSC News : MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
Embed widget