एक्स्प्लोर

Deool Band 2 Box Office Collection: 'देऊळ बंद 2' चा बॉक्स ऑफिसवर डंका; 100 कोटींपासून दोन पावलं दूर ! जगभरातील शो हाऊसफुल्ल; आतापर्यंत किती कमावले?

अगदी महाराष्ट्रातील छोट्या छोट्या खेड्यांपासून जगभरातील 16 देशांमध्ये मराठी चित्रपटाची पताका झोकात फडकत आहे. 

Deool Band 2 Box Office Collection: महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचून आणणारा 'देऊळ बंद 2:आता परीक्षा देवाची' (Deool Band 2)या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.21 मे 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.चित्रपट प्रदर्शित होऊन आता आठ आठवडे होत आली आहेत, दरम्यान हा चित्रपट 100 कोटी रुपयांच्या आकड्याला हात लावण्यासाठी केवळ दोन पावलं मागे आहे.  'चला पुढचे तीन दिवस जगभरातील मराठी प्रेक्षकांनी जोर लावा' असं म्हणत लेखक व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी चित्रपटाने आत्तापर्यंत केलेल्या कमाईचा आकडाच सांगितला. जगभरातील प्रेक्षकांकडून या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळताना दिसतोय.  गेल्या महिन्याभरात 16 देशांमध्ये या चित्रपटाचे 165 शो लागले होते. हा चित्रपट पाहण्यासाठी मराठी बांधव परदेशातही एकवटताना दिसत आहेत. अगदी महाराष्ट्रातील छोट्या छोट्या खेड्यांपासून जगभरातील 16 देशांमध्ये मराठी चित्रपटाची पताका झोकात फडकत आहे. 

देऊळ बंद 2 चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?

21 मे रोजी प्रदर्शित झालेल्या देऊळ बंद 2 चित्रपटाने फक्त पाच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर 90.50 कोटी रुपयांचा गल्ला केला. इतर देशांमध्ये 6.10 कोटी रुपये तर तंबू शोमधून 2.10 कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली. त्यामुळे एकूण कमाईचा आकडा 98.70 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी यासंदर्भातील एका पोस्टमधून ही माहिती दिली. 100 कोटींपासून आता फक्त दोनच पावलं उरली असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pravin Vitthal Tarde (@pravinvitthaltarde)

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने 2.89 कोटी रुपयांची कमाई केली होती. पहिल्या शुक्रवारी 3 कोटी मग 5 कोटी असा कमाईचा गिअर या चित्रपटाने पकडला. सहाव्या आठवड्यात झोकात एन्ट्री घेत शनिवारी 24 लाख रुपयांची कमाई केली. अजूनही चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. 'देऊळ बंद 2' या चित्रपटामध्ये स्नेहल तरडे,मोहन जोशी,अतुल कुडळे,प्रसाद ओक,मंगेश देसाई,ओम भुतकर,संस्कृती बालगुडे असे अनेक कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केलं आहे. केवळ भारतात नाही तर परदेशातही या चित्रपटाचे शो हाऊसफुल होताना दिसत आहेत. अमेरिका जपान दुबई ऑस्ट्रेलिया पोर्तुगाल डेन्मार्क कॅनडा आणि सिंगापूर अशा विविध देशांमध्ये देऊळ बंद 2 सिनेमा धुमाकूळ घालताना दिसतोय.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satluj: रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
Dashmi Marathi Movie Poster: महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
OTT Webseries: 7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget