एक्स्प्लोर

Deepjyoti Marathi Serial: ‘दीपज्योती’त मानसी सुभाषची एंट्री ठरतेय टर्निंग पॉइंट; खलनायिका बनण्यासाठी अभिनेत्रीची खास मेहनत

मानसीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. शाळा आणि कॉलेजमध्ये नाटकांमध्ये सहभाग घेत तिने आपली कला जोपासली.

Deepjyoti Marathi Serial: दीपज्योती या मालिकेत सध्या नाट्यमय घडामोडींना वेग आला असून, अभिनेत्री मानसी सुभाष साकारत असलेली ‘प्रीती’ ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे. सकारात्मकतेतून खलनायिकेकडे झुकणारा तिचा प्रवास हा कथानकाचा महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरत आहे.  या भूमिकेबद्दल आणि तिच्या अभिनयप्रवासाबद्दल तिने मनमोकळ्या गप्पा मारल्या.

सकारात्मक ते खलनायिका; प्रीतीचा वेगळा प्रवास

मानसी सुभाषने साकारलेली प्रीती ही ज्योती आणि कीर्तीची मोठी बहीण तर अभिजीतची लाडकी बहीण आहे. सुरुवातीला प्रेमळ, स्पष्टवक्ती आणि कुटुंबाची काळजी घेणारी अशी तिची प्रतिमा दिसते. मात्र, कथानक पुढे सरकत असताना तिच्या आयुष्यात मोठे धक्के बसतात. तिच्या लाडक्या भावाचा आणि होणाऱ्या नवऱ्याचा अपघात झाल्यानंतर ती मानसिकदृष्ट्या ढासळते आणि हळूहळू खलनायिकेच्या छटेत दिसू लागते.

““मी प्रीती ही भूमिका साकारत आहे. ती ज्योती आणि कीर्तीची मोठी बहीण आणि अभिजीतची लहान बहीण आहे. प्रीती खूप प्रोटेक्टिव्ह आणि पजेसिव्ह स्वभावाची आहे, विशेषतः तिच्या भावाबाबत. तिचे ठाम मत आहे की तिच्या दादाला कोणताही त्रास होऊ नये आणि त्याला राग येईल असे काहीही घडू नये. तिचा आणि तिच्या दादाचा खूप सुंदर बॉण्ड आहे. मालिकेच्या सुरुवातीला ती रोखठोक, प्रेमळ आणि सगळ्यांची काळजी घेणारी मुलगी म्हणून दिसते. पण जसजशी मालिका पुढे जाते, तसतशी तिच्या लाडक्या भावाचा आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा अपघात होतो. या परिस्थितीच्या दबावामुळे ती हळूहळू खलनायिकेच्या छटेत दिसू लागते." असं ती म्हणाली.

ती पुढे म्हणाली, "मला ऑडिशनसाठी कॉल आला होता. तेव्हा मला खूप आनंद झाला. मुळात मी प्रीतीच्या भूमिकेसाठी आले होते, पण ज्योतीच्या कॅरेक्टरसाठीही मी अनेक ऑडिशन्स दिल्या होत्या. नंतर मला कळवण्यात आले की माझी निवड प्रीतीच्या भूमिकेसाठी झाली आहे, जी ज्योतीची मोठी बहीण आहे. सुरुवातीला सकारात्मक असलेली मुलगी नंतर खलनायिकेकडे झुकते हा  प्रवास साकारताना मला खूप मजा येईल, असे मला वाटते. सुरुवातीला थोडी भीती वाटली होती, पण नंतर लक्षात आले की ही व्यक्तिरेखा परिस्थितीनुसार बदलणारी आहे, त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही. तयारी म्हणून मी खूप लहानसहान गोष्टींवर काम करत आहे. प्रेक्षकांना मी खलनायिका वाटली पाहिजे, यासाठी मी विशेष प्रयत्न करत आहे. उदाहरणार्थ, तिला कोणत्या गोष्टींवर राग येतो, ती कशी प्रतिक्रिया देते, अचानक वाईट वाटल्यावर ती कशी वागते आणि रागानंतर कशी शांत होते यावर मी सातत्याने सराव करत आहे. मी माझ्या व्यक्तिरेखेची बॅकस्टोरी समजून घेते आणि तिच्या अॅक्शन-रिअॅक्शनचा सखोल विचार करते. " असं मानसी सुभाष म्हणाली.

सेटवरची मैत्री; ऑफस्क्रीनही तितकीच घट्ट

मालिकेतील सहकलाकारांबद्दल बोलताना मानसी म्हणाली, “ज्योती, कीर्ती, अभिजीत आणि मी आम्ही सगळे खूप वेळ एकत्र घालवतो. आमची तिघींची खास गट्टी जमली आहे. कॅमेऱ्यासमोरच नव्हे, तर कॅमेऱ्यामागेही आमची मैत्री तितकीच घट्ट आहे.” ती पुढे म्हणाली, “आमच्यातील कोणी एक नसली, तर सेटवर रिकामेपणा जाणवतो. एकदा कीर्ती शूटला नव्हती, तेव्हा आम्हाला खूप वेगळं वाटलं. जणू काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं.”

लहानपणापासून अभिनयाची आवड

मानसीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. शाळा आणि कॉलेजमध्ये नाटकांमध्ये सहभाग घेत तिने आपली कला जोपासली. नृत्याचीही तिला आवड असून, घरच्यांकडून तिला “हिरोईन” अशी हाक मारली जायची.दरम्यान, प्रेक्षकांनी दीपज्योती ही मालिका दररोज रात्री ८ वाजता झी मराठीवर पाहायला विसरू नये.

महत्त्वाच्या बातम्या

The Alliance Season 1: 'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
Yashpal Sharma on Ladoo: 'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
Salman Khan on Pradeep Rawat: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...
CM Devendra Fadnavis On Ramayana Movie: 'रामायण' सिनेमाला ऑस्कर नाही मिळाला तर...; मुख्यमंत्र्यांनाही 'रामायण' सिनेमाची भुरळ, नेमकं काय म्हणाले?
'रामायण' सिनेमाला ऑस्कर नाही मिळाला तर...; मुख्यमंत्र्यांनाही 'रामायण' सिनेमाची भुरळ, नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Embed widget