एक्स्प्लोर

द्रौपदीचं म्हणणं जगासमोर आणायचं आहे - दीपिका

दीपिका पडुकोण आता पुन्हा एकदा कामात व्यग्र झाली आहे. आगामी महाभारत या चित्रपटात ती द्रौपदीची भूमिका साकाारते आहे. द्रौपदीचं म्हणणं जगासमोर मांडण्यासाठी ती एक संधी असेल असं तिला वाटतं.

गेल्या काही महिन्यांपासून दीपिका वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये दिसू लागली आहे. त्यापैकीच एक महत्वाकांक्षी चित्रपट मानला जातो तो महाभारत. या चित्रपटात ती द्रौपदीची व्यक्तिरेखा साकारते आहे. मधु मंटेना दिग्दर्शित हा चित्रपट महत्वाचा चित्रपट मानला जातो. या चित्रपटाबद्दल कमालीची गुप्तता पाळली जात असली तरी आता दीपिकाने मात्र या चित्रपटाबद्दल, भूमिकेबद्दल काहीसं सुतोवाच केलं आहे.

दीपिका सध्या महाभारत या चित्रपटातल्या द्रोपदीच्या व्यक्तिरेखेची तयारी करते आहे. या चित्रपटाबद्दल ती फारच उत्सुक आहे. हा चित्रपट आणि यातली भूमिका याबद्दल बोलताना ती म्हणाली, खरंतर हा सिनेमा माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. कारण, द्रौपदीबद्दल आपल्याला फारसं काही माहीत नाही. तेच द्रौपदीचं म्हणणं आता जगासमोर मांडायची इच्छा आहे. महाभारतात पांडवांनी खेळात द्रौपदीला डावावर लावलं आणि त्यानंतर कौरवांनी द्रौपदीचं वस्त्रहरण केलं ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. पण त्याहीपलिकडे स्त्री म्हणून तिला काय सांगावं वाटतं, काय म्हणावं वाटतं ते सांगण्याचा हा प्रयत् असणार आहे.

दीपिकाने अलिकडेच फेमिना या नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत याचा उच्चार केला आहे. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर संपूर्ण बॉलिवूड ढवळून निघालं होतं. यावेळी बॉलिवूडवर अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते. कोणीही बडा कलाकार यातून सुटला नव्हता. सुशांतच्या केसमध्ये आधी सीबीआय त्यानंतर इडी आणि त्यानंतर नार्कोटिक्स ब्युरोला भाग घ्यावा लागला होता. यातल्या एनसीबीने केलेल्या तपासात बरीच मोठी नावं बाहेर आली होती. या नावांना चौकशीसाठीही बोलवण्यात आलं होतं, यात दीपिकाचं नाव होतं. त्यावेळी दीपिका गोव्यात शूट करत होती. एनसीबीने चौकशीसाठी बोलावलं आणि त्यानंतर मात्र पुन्हा दीपिकाच्या नावाची चर्चा झाली नाही. दीपिकासोबत राकुल प्रीत सिंग, सारा खान, श्रद्धा कपूर यांचीही चौकशी झाली.

या चौकशीनंतर सर्वच कलाकार आपआपल्या कामात व्यग्र झाले. त्यात दीपिकाही आघाडीवर होती. सुशांतच्या मृत्यूनंतर २०२० हे वर्षं सर्वार्थाने वाईट गेलं. म्हणूनच त्याचे संकेत म्हणून दीपिकाने आपल्या इन्स्टा अकाऊंटवरून आजवर पोस्ट केलेले सर्व फोटो काढून टाकले. आणि नव्या वर्षात नव्याने फोटो पोस्ट करणं सुरू केलं, जणू ही तिची नव्यानेच सुरूवता असेल. म्हणूनच दीपिका आपल्या या वर्षातल्या आगामी प्रोजेक्ट्स बद्दल भरभरून बोलताना दिसते आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Marathi Actor On PM Modi Video: 'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
Kirti Kulhari Cyber Fraud : थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक
थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक;

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Embed widget