बंगळुरु : आयपीएल (IPL 2017) मध्ये काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (Royal Challengers Bengaluru) कोलकाता नाईट रायडर्सकडून (Kolkata Knight Riders ) पराभवाचा  सामना करावा लागला. आरसीबीनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 6 विकेटवर 182 धावा केल्या होत्या. आरसीबीच्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत कोलकाता नाईट रायडर्सनं 7 विकेट राखून विजय मिळवला. आरसीबीकडून सर्वाधिक 83 धावा विराट कोहलीनं केल्या. विराट कोहलीशिवाय (Virat Kohli) बंगळुरुकडून कॅमेरुन ग्रीननं 33 धावा केल्या तर ग्लेन मॅक्सवेलनं 28 धावांची खेळी केली. मात्र, केकेआरनं 182 धावांचं आव्हान यशस्वीपणे पार केलं. विराट कोहलीच्या बॅटिंगचं कौतुक करत  माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी आरसीबीच्या इतर फलंदाजांचे कान टोचले आहेत. 


सुनील गावस्कर काय म्हणाले?  (Sunil Gavaskar)


विराट कोहलीच्या फलंदाजीबाबत बोलताना सुनील गावस्कर म्हणाले नक्कीच त्यानं 120 धावा केल्या असत्या. विराट कोहलीला संघातील इतर फलंदाजांचा पाठिंबा आणि सहकार्य मिळायला हवं होतं. कोहली त्याच्या एकट्याच्या जबाबदारीवर किती करणार. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे हा काही वैयक्तिक खेळ नाही, असं सुनील गावस्कर यांनी म्हणत आरसीबीच्या इतर खेळाडूंचे कान टोचले आहेत. 


विराट कोहलीचं सलग दुसरं अर्धशतक


विराट कोहलीनं पंजाब किंग्ज विरुद्धच्या मॅचमध्ये 77 धावा केल्या होत्या. विराट कोहलीनं केकेआर विरुद्धच्या मॅचमध्ये देखील त्याच प्रकारे कामगिरी केली आहे. विराट कोहलीनं 59 बॉलमध्ये 83 धावांची खेळी केली आहे. विराटनं या खेळीमध्ये 4 चौकार आणि  4 सिक्स मारले होते.  


विराट कोहली आणि गौतम गंभीरची भेट


विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये यापूर्वी अनेकदा तणावाचं वातावरण पाहायला मिळायचं. विराट कोहली आणि गौतम गंभीर  हे कालच्या मॅचच्या निमित्तानं आमने सामने आले. यावेळी तणावाऐवजी दोन्ही खेळाडू एक दिलानं आमने सामने आले. हा प्रसंग पाहिल्यानं क्रिकेट चाहत्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे. 


आरसीबीचा दुसरा पराभव


फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्त्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची टीम होम ग्राऊंड असलेल्या  एम.  चिन्नास्वामी स्टेडियमवर सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवण्याच्या इराद्यानं मैदानात उतरली होती. आरसीबीनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 6 विकेटवर 182 धावा केल्या होत्या. केकेआरनं 7 विकेटनं विजय मिळवला. आरसीबीनं यापूर्वी चेन्नईकडून पराभव स्वीकारला होता. तर, पंजाब किंग्ज विरुद्ध विराट कोहली आणि दिनेश कार्तिकच्या खेळीच्या जोरावर त्यांनी विजय मिळवला होता. 


संबंधित बातम्या 


Hardik Pandya: हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ बॉलिवूड अभिनेता मैदानात, ट्रोलर्सला म्हणाला कॅप्टन असो की 15 वा खेळाडू ते...


KKR vs RCB : कोलकाताकडून जिव्हारी लागणारा पराभव, आरसीबीच्या कॅप्टननं सांगितलं नेमका धोका कुणी दिला?