एक्स्प्लोर

शेतकऱ्याचा पोर झाला दख्खनचा राजा, सांगलीचा विशाल झळकणार जोतिबावरच्या मालिकेत

दख्खनचा राजा जोतिबाचा महिमा मालिकेच्या रूपातून लवकरच छोट्या पडद्यावर येणार आहे. कोठारे व्हिजनने या मालिकेची निर्मिती केली असून जोतिबाची भूमिका कोण साकारणार ही चर्चा होती. या मालिकेच्या प्रोमोमधून अभिनेता विशाल निकम जोतिबाची भूमिका साकारणार असल्याचेही दिसून आलं आहे.

मुंबई: गुलाबी रंगाचा फेटा, पिळदार मिशा अशा रूपात जोतिबाचे दर्शन आजपर्यंत करोडो भाविकांनी घेतले आहे. कोल्हापुरातील जोतिबाच्या डोंगरावर असलेल्या या मंदिरात चैत्रयात्रेला मोठी गर्दी होते. दख्खनचा राजा या नावाने जोतिबा हे दैवत ओळखले जाते. जोतिबाचा महिमा मालिकेच्या रूपातून लवकरच छोट्या पडद्यावर येणार आहे. कोठारे व्हिजनने या मालिकेची निर्मिती केली असून जोतिबाची भूमिका कोण साकारणार ही चर्चा होती. आता  सध्या या मालिकेच्या प्रोमोमधून अभिनेता विशाल निकम जोतिबाची भूमिका साकारणार असल्याचेही दिसून आलं आहे. दरवर्षी विशिष्ट मालिकांचा ट्रेंड येत असतो. तसा छोट्या पडद्यावर काही महिन्यांपासून पौराणिक, देवी-देवतांच्या मालिकांचा ट्रेंड जोरावर आहे. खंडोबा, गणपती बाप्पा यांच्यासह आता ज्योतिबा देवाचीही मालिका तयार होऊ लागली आहे. कोल्हापुरातल्या चित्रनगरीमध्ये या मालिकेचं चित्रिकरण सुरू आहे. या मालिकेसाठी नव्या चेहऱ्याचा शोध सुरू होता. म्हणजे, जो चेहरा फार लोकांना माहीत नाही अशा चेहरा घेऊन त्यातून ज्योतिबा लोकांसमोर आणण्याचा मानस मालिकाकर्त्यांचा होता. त्याला आता यश आलं आहे. विशाल निकम हा कलाकार आता ज्योतिबाच्या रुपाने आपल्याला दिसणार आहे. या भूमिकेसाठी विशालने तब्बल 18 किलो वजन कमी केलं आहे. तर अनेक गोष्टी शिकूनही घेतल्या आहेत. विशाल यापूर्वी काही मालिकांत आणि चित्रपटात झळकला आहे. विशालला बॉडीबिल्डिंगची खूप आवड आहे. व्यायामाच्या आवडीतून त्याने सिक्सपॅक अॅब्जही बनवले  होते. पण जेव्हा त्याची निवड जोतिबाच्या भूमिकेसाठी झाली तेव्हा त्याला एका महिन्यात 12 किलो वजन कमी करावे लागेल अशी अट घालण्यात आली. जोतिबाच्या भूमिकेसाठी ती गरज असल्याने विशालही लगेच वजन कमी करण्याच्या तयारीला लागला. विशालसाठी पुढचा टास्क होता तो घोडेस्वारीचा. जोतिबाचे वाहन घोडा असल्याने मालिकेसाठी विशालला घोडेस्वारी येणे आवश्यक होतं. पण विशालने यापूर्वी कधीच घोडेस्वारी केली नव्हती. फक्त एक आठवड्यात विशालने घोडेस्वारीचे धडे गिरवले. विशाल निकम हा शेतकरी कुटुंबातला आहे. सांगलीतल्या खानापूरमध्येच त्याने शालेय शिक्षण घेतलं. कॉलेजच्या शिक्षणासाठी पुण्यात आणि नंतर जिम ट्रेनर म्हणून त्याचा मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू झाला. नृत्याची आणि अभिनयाची आवड त्याला होतीच. धुमस या सिनेमात तो  झळकला होता. अक्षया हिंदळकर हिच्यासोबत विशालने साता जन्माच्या गाठी या मालिकेत काम केलं आहे. या मालिकांनंतरही विशाल जिमट्रेनर म्हणून काम करतच होता. जेव्हा जोतिबा या मालिकेसाठी कास्टिंग सुरू होते तेव्हा विशालनेही आपले फोटो पाठवले. त्याची निवड झाल्याची बातमी त्याला कळाली आणि मग मात्र त्याच्या मनात गुलालाची उधळण सुरू झाली.

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Mangle: 'भैय्ये , नेपाळी कामाला ठेवले जातायत..' वैभव मांगलेची कोकणाच्या बदलत्या परिस्थितीवर पोस्ट; म्हणाला...
'भैय्ये , नेपाळी कामाला ठेवले जातायत..' वैभव मांगलेची कोकणाच्या बदलत्या परिस्थितीवर पोस्ट; म्हणाला...
Udhayanidhi Stalin on Trisha Krishnan: त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत
त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत
Brett Lee on Preity Zinta: ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
OTT Thriller: पहिल्याच सीझनने OTT गाजवलं, तब्बल 3 वर्षांपासून चाहते करतायत 'या' 8 एपिसोडच्या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा
पहिल्याच सीझनने OTT गाजवलं, तब्बल 3 वर्षांपासून चाहते करतायत 'या' 8 एपिसोडच्या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
Embed widget