मुंबई विमानतळावरुन 5 कोटींचं ड्रग्ज जप्त, NCBची कारवाई, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला ड्रग्ज पाठवलं जात असल्याची माहिती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Oct 2021 01:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई विमानतळावरुन 5 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. एनसीबीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबईहून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला हे ड्रग्ज पाठवलं जात असल्याची माहिती आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक म्हणजेच एनसीबीनं मुंबई विमानतळावर ५ कोटींचं ड्रग्ज जप्त केलंय. ब्लँकेटमधून ड्रग्ज मुंबईहून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला पाठवत जात असल्याची माहिती मिळतेय. कुरिअरद्वारे ड्रग्ज आंध्र प्रदेशातून मुंबई विमानतळ आणि इथून पुढे ते ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला पाठवण्याची योजना होती.