बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खान (ShahRukh Khan) त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं नेहमी जिंकत असतो. शाहरूखच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात. अनेकवेळा शाहरूख त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसतो. आपल्या मुलांसोबतचे फोटो तो सोशल मीडियावर शेअर करतो. शाहरूखने त्याच्या मुलांसाठी काही नियम तयार केले आहेत. त्यापैकी एक नियम म्हणजे शाहरूखचा मुलगा आर्यनला (Aryan Khan) घरामध्ये शर्ट न घालता फिरण्याची परवानगी नाही. एका मुलाखतीमध्ये शाहरूखने सांगितले होते की, 'पुरूषांना त्यांच्या घरातील महिला सदस्यांसमोर शर्टशिवाय फिरण्याची परवानगी नसावी.' शाहरूखला दोन मुलं आणि एक मुलगी आहे. त्याच्या मुलीचं नाव सुहाना असून तिच्या सोशल मीडियावर पोस्ट नेहमी चर्चेत असते. शाहरूखच्या सर्वांत छोट्या मुलाचे नाव अबराम खान असं आहे.  

Continues below advertisement

काही दिवसांपूर्वी शाहरूखने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, तो त्याच्या मुलाला अशा कोणत्याच सुविधा किंवा अधिकार देणार नाही, जे तो मुलींना देऊ शकत नाही. त्यामुळे शाहरूखने आर्यनला घरात शर्टलेस फिरण्यची परवानगी दिलेली नाही. आर्यनने यूनिवर्सिटी ऑफ सदन कॅलिफोर्नियामध्ये शिक्षण घेतले असून त्याने स्कूल ऑफ सिनेमॅटिक आर्ट्समधून फाइन आर्टस,सिनेमेटिक आर्ट्स, फिल्म आणि टेलिव्हीजन प्रोडक्शनमधून डिग्री मिळवली आहे.    

Pushpa Release Date : बहुप्रतिक्षीत 'पुष्पा' सिनेमा लवकरच होणार प्रदर्शित

Continues below advertisement

असं कोणतचं काम करू नये जे मुली करू शकत नाहित शाहरूखने सांगितले होते की, जर तुम्हाला मैत्रिणी तसेच आजूबाजूच्या महिलांनी शर्टलेस फिरने मान्य नसेल तर तुम्ही असं कसे समजू शकता की, त्यांना तुम्ही शर्टलेस फिरणे मान्य आहे. 

आर्यनबद्दलने शाहरूखने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते, 'आर्यनला माझ्यापेक्षा मोठ व्हायचंय आणि ही गोष्ट चांगली आहे. ' एका चाहत्याने शाहरूखला प्रश्न विचारला होती की, 'तुम्ही कॉफी विथ करण या शोमध्ये सांगितले होते की माझे कोणी मित्र नाहित आणि मला मैत्री टिकवता येत नाही. तर तुम्ही अजूनही असा विचार करता का?' या प्रश्नावर शाहरूखने उत्तर दिले होते, 'नाही, माझी मुलंच माझे मित्र आहेत.

Bigg Boss 15 Premiere: प्रेक्षकांना पहायला मिळणार मौनी रॉयचा ग्लॅमरस अंदाज

लवकरच शाहरूख पठाण या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे अशी चर्चा आहे. पठाण या शाहरूखच्या आगामी चित्रपटामध्ये दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमने देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. त्याच्या या आगामी चित्रपटांबद्दल त्याचे चाहते उत्सुक आहेत.