एक्स्प्लोर

OTT Release This Week: या आठवड्यात OTTवर क्राईम थ्रिलर्सचा जबरदस्त धुमाकूळ; धुरंधर 2सह 'या' धमाकेदार फिल्म्स, वेबसिरीज धडकणार

या आठवड्यात  काही दमदार चित्रपट आणि वेबसीरिज रिलीज होणार आहेत.

OTT Release This Week: बुधवार आला की विकेंडची चाहूल लागायला सुरुवात होते. आठवडाभराच्या धावपळीनंतर दोन दिवस मोकळेपणाने कसे घालवायचे, याचा प्लॅन अनेक जण बनवू लागतात. काहीजण फिरायला जाण्याचा बेत आखतात, तर काही मित्र-परिवारासोबत वेळ घालवतात. पण अनेकजण असेही असतात, ज्यांना घरात आराम करत आपल्या आवडत्या वेबसीरिज आणि चित्रपटांचा बिंज-वॉच करायला जास्त आवडतं. तुम्हीही हाच विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. 13  मे ते 19  मे दरम्यान OTT वर मनोरंजनाचा जबरदस्त डोस मिळणार आहे.या आठवड्यात  काही दमदार चित्रपट आणि वेबसीरिज रिलीज होणार आहेत.

 धुरंधर 2 

रणवीर सिंहचा बहुचर्चित ‘Dhurandhar: The Revenge’ अखेर OTT वर धडक देणार आहे. १५ मे रोजी JioHotstar वर रिलीज होणाऱ्या या चित्रपटात रणवीर पुन्हा एकदा अंडरकव्हर स्पायच्या भूमिकेत दिसणार आहे. 26/11 हल्ल्याचा बदला घेण्यासाठी कराचीच्या अंडरवर्ल्डमध्ये घुसलेल्या जसकीरत सिंग रंगीची ही कथा अधिक रक्तरंजित आणि धोकादायक मिशन घेऊन येणार आहे. अॅक्शन, राजकारण आणि दहशतवादाच्या खेळात रणवीरचा हा अवतार प्रेक्षकांना हादरवणार असल्याचं बोललं जात आहे.चित्रपटात सारा अर्जुन, अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि आर. माधवन हे कलाकार पुन्हा आपल्या भूमिकेत दिसणार आहेत.

कर्तव्य 

सैफ अली खानचा आतापर्यंतचा सर्वात गंभीर आणि थरारक अवतार ‘Kartavya’ मध्ये पाहायला मिळणार आहे. शाहरुख खानच्या Red Chillies Entertainment निर्मित हा कॉप-थ्रिलर १५ मेपासून Netflix वर स्ट्रीम होणार आहे. एका पत्रकाराच्या हत्येनंतर सुरू होणारी ही कथा भ्रष्टाचार, सत्ता आणि गुन्हेगारीच्या जगात घेऊन जाणार आहे. आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी आणि सत्य बाहेर आणण्यासाठी झगडणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची ही कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवेल.

Exam

स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीमागचं काळं वास्तव उघड करणारी ‘Exam’ ही सिरीज 15  मे रोजी Prime Video वर रिलीज होणार आहे. एका रहस्यमय तरुणीची ही कथा भ्रष्ट यंत्रणेविरुद्धचा स्फोटक संघर्ष दाखवणार आहे. पेपर लीक, राजकीय दबाव आणि सत्तेच्या गलिच्छ खेळामुळे ही सिरीज सध्या चर्चेत आली आहे. थरार आणि सामाजिक वास्तव यांचा जबरदस्त संगम असलेली ही सिरीज प्रेक्षकांसाठी मोठं आकर्षण ठरणार आहे. 7 भागांची ही वेबसीरिज 15  मे रोजी Prime Video वर रिलीज होणार आहे. 

अभिनेत्री दुशारा विजयन एका रहस्यमय भूतकाळ असलेल्या तरुणीच्या भूमिकेत दिसणार आहे. अन्याय, महत्त्वाकांक्षा आणि सत्तेच्या खेळामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतात. या सीरिजमध्ये अदिती बालन, अब्बास, वसुंधरा कश्यप आणि नरेन मणी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

इन्स्पेक्टर अविनाश सिझन  2

‘इन्स्पेक्टर अविनाश सिझन 2’ 15 मे रोजी JioHotstar वर रिलीज होणार आहे. वास्तविक घटनांवर आधारित या सिरीजमध्ये रणदीप हुड्डा पुन्हा एकदा निर्भीड एन्काऊंटर स्पेशालिस्ट अविनाश मिश्रा बनून परततोय. यावेळी अविनाश बेकायदेशीर शस्त्रास्त्रांच्या नेटवर्कविरुद्ध लढताना दिसणार आहे. मात्र त्याचवेळी त्याचा मुलगा खून प्रकरणात अडकल्याने त्याचं वैयक्तिक आयुष्यही हादरून जातं. अॅक्शन, थरार आणि इमोशनल ड्रामाचा तुफान डोस असलेला हा सीझन प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Vanita Kharat Scam: 'तुमचं पार्सल येणार आहे, डिलिव्हरी बॉयला पत्ता मिळत नाहीय' 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनीता खरातसोबत घडला 62 हजाराचा स्कॅम, VIDEO
'तुमचं पार्सल येणार आहे, डिलिव्हरी बॉयला पत्ता मिळत नाहीय' 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनीता खरातसोबत घडला 62 हजाराचा स्कॅम, VIDEO
Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Embed widget