![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Arijit Singh Mother Death : प्रख्यात पार्श्वगायक अरिजीत सिंहच्या आईचे निधन
अरिजीतच्या आई आदिती सिंह यांना कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 17 मे ला त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. परंतु त्यांची प्रकृती चिंताजन होती.
![Arijit Singh Mother Death : प्रख्यात पार्श्वगायक अरिजीत सिंहच्या आईचे निधन Coronavirus Update: Singer Arijit Singh mother is died today fighting with covid19 Arijit Singh Mother Death : प्रख्यात पार्श्वगायक अरिजीत सिंहच्या आईचे निधन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/20/bbfd8a6d2455a339dffb85837ce3a73b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : तुम ही हो सारख्या गाण्यांमुळे प्रसिद्धीझोतात आलेला बॉलिवूड गायक अरिजीत सिंह याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अरिजित सिंहने गुरुवारी आईला गमावले. कोलकाताच्या आमरी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला
अरिजीतच्या आई आदिती सिंह यांना कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 17 मे ला त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. परंतु त्यांची प्रकृती चिंताजन होती.
एबीपी न्यूजशी बोलताना चित्रपट दिग्दर्शक श्रीजीत मुखर्जी म्हणाले, अरिजीत, मी आणि चित्रपट सृष्टीतील अनेकांना आदिती सिंह यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु गुरुवारी त्यांची प्रकृती अधिक ढासाळली आणि सेरेबल (ब्रेन) स्टोकमुळे रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.
श्रीजीत मुखर्जींनी काही दिवसांपूर्वीच अरिजीतच्या आईला ए निगेटिव्ह रक्ताची आवश्यकता असल्याची पोस्ट सोशल मीडियावर लिहिली होती. त्यानंतर अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी यांनी देखील रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. अरिजीत सिंह यांच्या आईवर मुर्शिदाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)