वडिलांच्या मृत्यूला रुग्णालयच जबाबदार, अभिनेत्री संभावना सेठचा गंभीर आरोप
संभावना सेठच्या वडिलांचा मृत्यू 8 मे ला झाला . परंतु वडिलांच्या मृत्यूनंतर 13 दिवसांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातल्याला संभावनाचा व्हिडीओ समोर आला आहे.

मुंबई : संपूर्ण जगाला विळखा घालणाऱ्या कोरोनाने भारतात देखील थैमान घातले. परिणामी, अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन सिलेंडर बेड आणि औषधांची कमतरता जाणवू लागली आहे. डॉक्टर्स आणि आरोग्यक्षेत्रातील सर्व कर्मचारी रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी धडपड करत आहे. अपुऱ्या आरोग्यव्यवस्थेमुळे दररोज रुग्णांचे होणारे हाल पाहून डॉक्टरदेखील भावनिकदृष्टया हतबल झाले. अशी परिस्थिती असताना रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप अभिनेत्री संभावन सेठने केला आहे.
अभिनेत्री संभावन सेठच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. संभावना सेठच्या वडिलांचा मृत्यू 8 मे ला झाला परंतु वडिलांच्या मृत्यूनंतर 13 दिवसांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातल्याला संभावनाचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप संभावना सेठने केला आहे. उपचारादरम्यान संभावना सेठ रुग्णालयातल्या कर्मचा-यांना जाब विचारताना दिसत आहे. यावर कोणीही तिला समाधानकारक उत्तर देताना दिसत नाही. डॉक्टर आणि नर्स कोणीही संभावनाच्या प्रश्नाला उत्तर देत नाही. जवळपास 8 मिनीटाच्या या व्हिडीओनंतर संभावनाने लिहले की, या सर्व गोंधळानंतर दोन तासानंतर मृत्यू झाला. माझ्या वडिलांचा मृत्यू कोरोनाने नाही तर रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे. ज्याची किंमत रुग्णालयाला चुकवावी लागणार आहे. माझे वकिल रुग्णालयाला लवकरच लिगल नोटीस पाठवणार आहे.























