Coldplay Concert in Mumbai : जगप्रसिद्ध 'कोल्डप्ले' म्युझिक बँडच्या कॉन्सर्टच्या तिकीटांवरून होणाऱ्या काळाबाजाराची मुंबई पोलिसांकडून दखल घेण्यात आली आहे. बुक माय शोच्या प्रमुखांना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स जारी करण्यात आलं आहे. यामध्ये शेकडो कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.  बुक माय शोच्या प्रमुखांना शनिवारी मुंबई पोलीस आयुक्तालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोल्डप्लेच्या कॉन्सर्टची तिकीटे मूळ किंमतीपेक्षा 30 ते 40 टक्के चढ्या भावानं विकली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 


'कोल्डप्ले'च्या तिकीटांचा मोठा काळाबाजार


'कोल्डप्ले' कॉन्सर्ट आयोजक कंपनीकडून बुक माय शोनं तिकीट विक्रीचे हक्क मिळवले आहेत. मात्र तिकीटांच्या काळ्याबाजाराला प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाईन तिकीटविक्री सुरू होताच काही काळासाठी जाणूनबुजून सर्व्हर डाऊन केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. अमित व्यास नामक वकिलानं दाखल केलेल्या तक्रारीची कॉपी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. 


तिकीटांच्या काळाबाजाराची मुंबई पोलिसांकडून दखल


जगप्रसिद्ध 'कोल्डप्ले' या म्युझिकल बँडच्या वर्ल्ड टूरचे भारतातील शो 18, 19 आणि 21 जानेवारी 2025 रोजी होणार आहेत. नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये हे म्युझिक कॉन्सर्ट पार पडणार आहे.  'कोल्डप्ले' रॉकबँडचा हा ठरणार शेवटचा लाईव्ह शो असल्याचं बोललं जात आहे. या वर्ल्ड टूअरनंतर कोल्डप्ले निवृत्त होणार अशी चर्चा रंगली आहे.


कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकीटांची चढ्या दराने विक्री


COLD PLAY च्या मुंबईतील कॉन्सर्टची तुफान चर्चा आहे. कोल्डप्लेच्या कॉन्सर्च्या तिकींटाचा काळाबाजार सुरु असल्याचं समोर आलं आहे. बुक माय शोच्या साईटवरुन तिकीट बूक होत नसून सारख्या इतर प्लॅटफॉर्मवर वर Black market मध्ये तिकीटे लाखो रूपयांना विकली जातात, असा आरोप मनसेनं केला होता. कॉन्सर्टवरुन मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच मनसेकडून BookMyShow ला इशारा देखील देण्यात आलाय. यानंतर आता पोलिसांनीही याची गंभीर दखल घेतली आहे.



Bigg Boss Marathi : "निक्की घराबाहेर आल्यावर मी तिला सगळं सांगेन", साखरपुडा झाल्याच्या चर्चांवर अरबाजची प्रतिक्रिया