Cinema Lover Day: बॉलिवुड हे असे क्षेत्र आहे, जिथे नेहमीच दर्जेदार आणि सरस चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. असे चित्रपट निर्माण करण्यासाठी या क्षेत्रात कार्यरत असणारे दिग्गज दिवसरात्र एक करतात. एकीकडे दर्जेदार सिनेमे येत असले तरी चित्रपटांचे तिकीट मात्र फारच महाग असते अशी तक्रार नेहमीच सिनेरसिकांकडून केली जाते. हीच बाब समजून घेत आता लोकांनी चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांकडे वळावे यासाठी निर्माते वेगवेगळी शक्कल लढवतात. दरवर्षी काही दिवसांसाठी सिनेमा लव्हर्स डे अंतर्गत फक्त 99 रुपयांत कोणताही सिनेमा पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. या वर्षाचा पहिला सिनेमा लव्हर्स डेदेखील ठरवण्यात आला असून या दिवशी तुम्हाला कोणताही चित्रपट फक्त 99 रुपयांत पाहता येणार आहे.
येत्या 17 जानेवारीर रोजी सिनेमा लव्हर्स डे
सध्या सिनेमागृहांत गेम चेंजर, डाकू महाराज हे चित्रपट चालू आहेत. तर इमर्जन्सी, आझाद यासारखे दर्जेदार येत्या 17 जानेवारीर रोजी प्रदर्शित होणार आहेत. आता हे सर्व सिनेमे तुम्हाला सिनेमा लव्हर्स डे अंतर्गत फक्त 99 रुपयांत पाहता येणार आहेत. या वर्षाचा पहिला सिनेमा लव्हर्स डे हा 17 जानेवारी 2025 रोजी ठरवण्यात आला आहे. म्हणजेच या दिवशी तुम्हाला कोणताही चित्रपट फक्त 99 रुपयांत पाहता येणार आहे. देशभरातली बहुसंख्य सिनेमागृहे आणि मल्टिप्लेक्स ही सुविधा देणार आहेत. सिनेमागृहात लोकांची गर्दी व्हावी तसेच चित्रपटाचा गल्ला भरावा हादेखील यामागचा हेतू आहे.
आझाद, इमर्जन्सी चित्रपट 99 रुपयांत पाहता येणार
येत्या शुक्रवारी म्हणजेच 17 जानेवारीर रोजी तुम्ही दिवसभरात कोणताही चित्रपट 99 रुपयांत पाहता येणार आहे. यामध्ये कंगना रणौतचा इमर्जन्सी हा चित्रपटही पाहता येणार आहे. कारण हा चित्रपट येत्या 17 जानेवारी रोजीच प्रदर्शित होणार आहे. रविना टंडनची मुलकी राशा थडानी हिचा आझाद हा चित्रपटदेखील याच दिवशी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे हे दोन्ही चित्रपट तुम्हाला 17 जानेवारी रोजी 99 रुपयांत पाहता येणार आहेत.
तुम्हाला कोण-कोणते चित्रपट 99 रुपयांत पाहता येणार?
तुम्हाला या दिवशी अनेक चित्रपट फक्त 99 रुपयांत पाहता येणार आहेत. यात इमर्जन्सी, आझाद, पुष्पा-2 हे चित्रपट 99 रुपयांत पाहता येतील 5 डिसेंबर 2024 रोजी पुष्पा-2 हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट अजूनही सिनेमागृहांत चालू आहे. त्यानंतर फतेह, मुफ्सा- द लायन किंग यासारखेही चित्रपट तुम्हाला 99 रुपयांत पाहता येतील. यासोबतच ‘कहो ना प्यार है’, ‘ये जवानी है दीवानी’ आणि ‘सत्या’ यासारखे रि-रिरिलीज होणारे चित्रपटही तुम्हाला पाहता येतील.
हेही वाचा :
44 वर्षाच्या श्वेता तिवारीचं मनोहारी सौंदर्य, लेकीपेक्षा दिसते भारी; नव्या फोटोशूटने चाहते घायाळ!
'देवमाणूस'मध्ये झळकणार महेश मांजरेकर, रेणुका शहाणेंची जोडी; 25 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला