Harsha Richhariya Video: उत्तर प्रदेशमधील महाकुंभमेळ्यात (Uttar Pradesh Kumbhmela 2024) दिसलेल्या एका सुंदर तरुणीची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. ही तरुणी एका व्हिडीओत ती स्वत:ला साध्वी असल्याचं सांगत होती. त्यानतंर हा व्हिडीओ देशभरात चांगलाच व्हायरल झाला. या तरुणीचे नाव हर्षा रिछारिया (Harsha Richhariya) असल्याचं समोर आलं आहे. 


हर्षा रिछारियाचा आता नवीन व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये हर्षाने गर्लफ्रेंडला वश करण्यासाठी एक मंत्र दिला आहे. ओम गिली गिली छू, ओम फट स्वाहा...असा मंत्र म्हटल्यावर गर्लफ्रेंड लग्नासाठी एका पायावर तयार होईल, असा दावा हर्षा रिछारियाने केला आहे. हर्षाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


हर्षा रिछारियाचा व्हायरल होणारा संपूर्ण व्हिडीओ-






एबीपी माझाशी बोलताना हर्षा रिछारिया काय म्हणाली?


सगळीकडे प्रसिद्ध झालेल्या या तरुणीने एबीपी माझाशी बातचित करताना मी साध्वी नसल्याचं तिनं सांगितलं आहे. मी लहानपणापासून साध्वी आहे, असं मी कुठेही सांगितलेलं नाही. मी आतादेखील साध्वी नाही. मी याबाबत वेळोवेळी स्पष्टीकरण दिलेलं आहे. मी फक्त एक मंत्र दीक्षा घेतलेली आहे, तसेच मी सनात संस्कृती आणि धर्माकडे वळले आहे. मी अगोदर अँकरिंग, अभिनय, मॉडेलिंग केलेलं आहे. हे करून मी जर इकडे येत असेल तर त्यात चुकीचं काय आहे, असं हर्षा रिछारियाने म्हटलंय.






कोण आहे हर्षा रिछिरिया?


हर्षा रिछारिया ही अँकर, मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. महाकुंभमध्ये येण्यापूर्वी तिचे सोशल मीडियावर जवळपास साडेपाच लाख फॉलोअर्स होते. मात्र आता तो आकडा वाढून आठ लाख इतका झाला आहे. ग्लॅमरच्या दुनियेतून ऋषी-मुनी, साधू-संतांच्या महाकुंभमध्ये येण्याबाबत हर्षा रिछारिया म्हणाली की, काही गोष्टी आपल्या नशिबात लिहिलेल्या असतात. आपल्या आयुष्यात कधी काय घडावं, हे आधीच ठरलेलं असतं. मी माझं आयुष्य खूप चांगल्याप्रकारे जगतेय, परदेशात फिरतेय. आता काही काळ मी या सर्वांमधून ब्रेक घेतला आहे.


संबंधित बातमी:


आधी कुंभमेळ्यात 'सुंदर साध्वी' म्हणून प्रसिद्ध, पण भलतंच सत्य समोर आलं; 'ती' तरुणी म्हणाली, मी तर....