पुणे : कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणात (Pune Accident News) रोज नवे अपडेट येत आहे. पुणे अपघाताविषयी लोकांच्या मनात प्रचंड राग, संताप आहे. दरम्यान गुरुवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाल आणि पुन्हा त्या रॅप साँगने आणखी वातावरण तापवलं. हा व्हिडीओ पुणे अपघात प्रकरणतील लाडोबा असल्याचे म्हणत सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. मात्र काही वेळातच हे शिवीगाळ करणारं रॅप बिल्डरपुत्राचे नसल्याचा दावा पोलिसांनी केला. तर लेकाच्या बचावासाठी आईने पहिल्यांदा पुढे येत रॅप साँग मुलाचे नसल्याचं म्हटलं आहे.
धनिकपुत्राला बाल हक्क न्यायालयाने 14 दिवसांसाठी बालसुधारगृहामध्ये पाठवलं आहे. त्याचे वडील विशाल अग्रवालला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. तर आजोबा सुरेंद्र अग्रवाल याची देखील काल चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान सोशल मीडियावर एका रॅप साँगने वातावरण तापवलं होतं. या व्हिडीओतील तरुण अर्वाच्च भाषेत बोलताना दिसला.इतकंच नाहीतर त्याने शिवीगाळही केली. तो मुलगा अल्पवयीन आणि त्याचे देहबोली बिल्डरपुत्रासारखी असल्याचं दिसत आहे. त्यामुळे तो व्हिडीओमधील तरूण बिल्डर पुत्र असल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी त्याला धारेवर धरलं. अशातच यावर वेदांतची आई शिवानी अग्रवाल यांनी आपली प्रतिक्रिया देत ते रॅप साँग वेदांतचं नसल्याचं म्हटलं आहे.
व्हायरल व्हिडीओवर बिल्डरपुत्राची आई म्हणाली...
अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवाल यांनी स्पष्टीकरण देत एक व्हिडीओ केला. हा माझा मुलगा नसून मुलाचा व्हिडीओ फेक असल्याचं म्हणत शिवानी अग्रवाल यांनी पोलिसांना विनंती केली. यावेळी बोलताना बिल्डरपुत्राची आई ढसाढसा रडली. बिल्डरपुत्राची आई म्हणाली, मी मीडियाला विनंती करते की, व्हायरल होत असलेला व्हिडीओ तो माझ्या लेकाचा नाही. तो फेक व्हिडीओ आहे. माझा मुलगा रिमांड होममध्ये आहे. मी पोलीस कमिशनरांना विनंती करते की, त्याला प्रोटेक्ट करा, प्लीज माझ्या मुलाला वाचवा...
व्हिडीओ फेक आहे : पुणे पोलीस आयुक्त
तर आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देखील याचा खुलासा केला आहे.अमितश कुमार म्हणाले, व्हिडीओ फेक आहेत. कुणी तयार केलेत ते तपासले आहेत. अल्पवयीन आरोपीने तयार केलेले नाही. या संदर्भात अधिक चौकशी सुरू आहे.
Viral Video :
हे ही वाचा :