Vikram : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील  प्रसिद्ध अभिनेता चियान विक्रमला (Chiyaan vikram) काही दिवसांपूर्वी तब्येत बिघडल्यामुळे चैन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  छातीत दुखत असल्यानं विक्रमला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी विक्रमला ह्रदयविकाराचा झटका आला आहे, अशी अफवा काही लोक पसरवत होते. चियान निक्रमचा मुलगा ध्रुवनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन विक्रमच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. आता नुकत्याच एका इव्हेंटमध्ये विक्रमनं त्याच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. 


काय म्हणाला विक्रम? 
एका ऑडिओ लाँच इव्हेंटमध्ये चियान विक्रमनं त्याच्या प्रकृतीबाबत लोकांनी पसरवलेल्या अफवांबद्दल सांगितलं. तो म्हणाला, 'मला ह्रदय विकाराचा झटका आला नव्हता. लोक माझे फोटो एडिट करुन सोशल मीडियावर व्हायरल करत होते. आजारी असलेल्या व्यक्तीच्या फोटोवर माझा चेहरा लावून लोक फोटो एडिट करत होते. ते लोक या फोटोंचा थंबनेल इमेज म्हणून वापर करत होते. मी त्या लोकांच्या क्रिएटिव्हिटीचं कौतुक करतो. धन्यवाद. ' विक्रमच्या मॅनेजरनं म्हणजेच सूर्यनारायण एम यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन विक्रमच्या प्रकृतीची माहिती दिली होती. 


पाहा व्हिडीओ:






विक्रमचा 'पोन्नियिन सेल्वन' लवकरच होणार रिलीज 
लवकरच चियान विक्रम यांचा ‘पोन्नियिन सेल्वन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक मणिरत्नम यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री  ऐश्वर्या राय बच्चन, आदित्य करिकलन यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 'पोन्नियिन सेल्वन' हा सिनेमा दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा कल्कि यांच्या एका तामिळ कादंबरीवर आधारित आहे. 1995 साली कल्कि यांनी ही कादंबरी लिहिली आहे. कोबरा हा देखील विक्रमचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाध्ये  श्रीनिधी शेट्टी प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. 


हेही वाचा:


Vikram : 'त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला नाही, या अफवा ऐकून दु:ख झालं'; अभिनेता विक्रमच्या मुलानं दिली माहिती