Mythological Series The Last Hour: अनुराग कश्यपच्या (Anurag Kashyap) 'सेक्रेड गेम'नं (Sacred Games) केवळ लोकांचा OTT कडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलला नाही तर हेही दाखवून दिलं की शेवटी कंटेंट असेल तरच सर्वकाही आहे. सेक्रेड गेम्स लोकांना प्रचंड आवडली. याच सीरिजमुळे नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सैफ अली खान पुन्हा एकदा स्टार म्हणून उदयास आले. ही भारतातील पहिली वेब सिरीज होती. विशेष म्हणजे, याचा संबंध पौराणिक संकल्पनेवरही आधारित होता.


'सेक्रेड गेम' नंतर अनेक वेब सीरिज मायथोलॉजीवर बनल्या. 'असुर' आणि 'दहन' सारख्या काहींना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. 'असुर'च्या तिसऱ्या सीझनचीही तयारी सुरू आहे. लवकरच तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. पण आम्ही तुम्हाला आणखी एका अशाच वेब सीरिजबाबत सांगणार आहोत, ज्या मायथोलॉजीवर बनल्यात, ज्या पौराणिक संकल्पनेवर बनवण्यात आल्या आहेत. ही एक सुपरनैचुरल थ्रिलर सीरीज आहे.



2021 मध्ये रिलीज झालेल्या या सुपरनैचुरल मायथोलॉजिकल थ्रिलर सीरीजचं नाव 'द लास्ट आवर' आहे. या सीरिजमध्ये संजय कपूरनं पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती, ज्याचं खूप कौतुक झालं होतं. सीरिज सस्पेन्सनं भरलेली आहे. 'द लास्ट अवर' मध्ये मर्डर मिस्ट्री, आत्म्यांशी बोलणारा मुलगा आणि जीवनाचे नियम, असे अनेक इंटरेस्टिंग मुद्दे आहेत. सीरिजमध्ये अनेक ट्विस्ट पाहायला मिळतात. या सीरिजचं चित्रीकरण ईशान्येत झालं आहे. त्यात अनेक सुंदर लोकेशन्स बघायला मिळतात.



सीरिजची कहाणीच्या केंद्रस्थानी एका बंगाली अभिनेत्रीच्या रेप आणि मर्डरचं इन्वेस्टिगेशन आहे. आत्म्याशी बोलणारा शामन समुदायातील एक मुलगा देव आहे, जो खूप उत्तम तीरंदाजी करतो. पोलीस ऑफिसर मर्डर मिस्ट्री सोडवण्यासाठी त्या मुलाची मदत घेतो. देव आत्म्यांशी शेवटच्या तासात बोलतो. कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू पाहू शकणाऱ्या माणसालाही तो आंधळा करतो. सीरिजचा क्लायमॅक्स तुम्हाला खूप आश्चर्यचकित करतो. 



'द लास्ट आवर' च्या क्लायमॅक्समध्ये एक तलाव आणि स्वर्गाचा मार्ग दाखवला आहे. देव पोलीस अधिकाऱ्याला याबद्दल सांगतो. समीक्षकांनाही ही मालिका खूप आवडली. संजय कपूर आणि इतर कलाकारांचंही खूप कौतुक झालं. 'द लास्ट आवर' चे IMDb रेटिंग 7.1 आहे, जे टिस्का चोप्राच्या 'दहन' च्या बरोबरीचं आहे. 'असुर'चं आयएमडीबी रेटिंग8.5 असलं तरी. 'द लास्ट आवर' ही सुद्धा उत्तम मालिका आहे. तुम्ही Amazon Prime Video वर पाहू शकता.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Pushpa 2 Flop: बॉक्स ऑफिस गाजवणारा 'पुष्पा 2' एका ठिकाणी सुपरफ्लॉप; 40 कोटींच्या 'या' चित्रपटासमोर कमावले फक्त 3.55 कोटी, थेट धोबीपछाड