एक्स्प्लोर

Chikizing Marathi Movie Poster: निरागस बालविश्वाची, स्वप्नांची आणि जिद्दीची हळुवार गोष्ट सांगणाऱ्या 'चिकिझिंग'चं पोस्टर पाहिलंत?

Chikizing Marathi Movie Poster: एखादा रंगीत दगड म्हणजे खजिना, एखादी काठी म्हणजे जादूची कांडी आणि एका बंद दरवाजापलीकडचं जग म्हणजे एक मोठं स्वप्न! याच निरागस बालविश्वाची, स्वप्नांची आणि जिद्दीची हळुवार गोष्ट सांगणाऱ्या 'चिकिझिंग' या आगामी मराठी चित्रपटाचं पहिलं पोस्टर आज प्रदर्शित करण्यात आलं.

Chikizing Marathi Movie Poster: बालपण म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं… एखादा रंगीत दगड म्हणजे खजिना, एखादी काठी म्हणजे जादूची कांडी आणि एका बंद दरवाजापलीकडचं जग म्हणजे एक मोठं स्वप्न! याच निरागस बालविश्वाची, स्वप्नांची आणि जिद्दीची हळुवार गोष्ट सांगणाऱ्या 'चिकिझिंग' या आगामी मराठी चित्रपटाचं पहिलं पोस्टर आज प्रदर्शित करण्यात आलं. त्यासोबतच हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत, 12 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

दिपक वाणी आणि जयप्रकाश भांडे प्रस्तुत 'चिकिझिंग' (Chikizing) या चित्रपटाची निर्मिती ए थीमटीम स्टुडिओ प्रॉडक्शनने कीफ्रेम प्रॉडक्शन यांच्या सहकार्याने केली आहे. सुप्रिया बागते या चित्रपटाच्या निर्मात्या असून शब्बीर साबुवाला, रचना वोरा, ऋषिकेश देशमुख, सिड विंचुरकर, करण चव्हाण, उन्मेश कुलकर्णी सहनिर्माते आहेत. राजेंद्र बागते आणि वैभव कुलकर्णी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. एका हिलस्टेशनच्या पार्श्वभूमीवर घडणारी ‘चिकिझिंग’ची कथा आहे, गरिबीच्या परिस्थितीत वाढणाऱ्या एका चुणचुणीत, स्वप्नाळू आणि खोडकर मुलाची. 


Chikizing Marathi Movie Poster: निरागस बालविश्वाची, स्वप्नांची आणि जिद्दीची हळुवार गोष्ट सांगणाऱ्या 'चिकिझिंग'चं पोस्टर पाहिलंत?

दर शनिवारी आईसोबत एका श्रीमंत निवासी शाळेत जाणारा चिक्या त्या शाळेच्या भव्य जगाने भारावून जातो. बंद असलेलं भलंमोठं लोखंडी गेट आणि त्याच्या आतलं अनोखं विश्व… हे सगळं त्याला स्वप्नवत वाटतं. त्या स्वप्नाचा गुप्तपणे पाठलाग करण्याचा प्रवास, त्याची सगळी गुपितं जपून ठेवणारा त्याचा एकमेव मित्र म्हणजे स्ट्रॉबेरीच्या शेतातलं बुजगावणं; त्याच्याशी गप्पा, तायडीसोबत लाकूडफाटा गोळा करणं, दिवाळीत इतर मुलांनी फटाके फोडताना लांबून ते पाहणं, वेगवेगळ्या वस्तू आपल्या शाळेच्या दप्तरात जपून ठेवणं… या छोट्या छोट्या गोष्टींमधून त्याचं जग उलगडत जातं. पण या सगळ्या अतर्क्य वाटणाऱ्या गोष्टी तो का करतो? ही फक्त निरागसता आहे का? त्याच्या मनात नेमकं काय चाललंय? त्याच्या रडारवर काय आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधताना मनोरंजनाबरोबरच प्रेक्षकांना अंतर्मुख करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला गेला आहे. 

‘चिकिझिंग’ हा केवळ मुलांसाठीचा चित्रपट नसून मुलांसोबत पालकांनीही अनुभवावा असा बालपण, स्वप्नं, कुटुंब आणि आशावाद यांचा हळुवार उत्सव आहे. आजच्या धावपळीच्या जगात मुलांच्या कल्पनाशक्तीला आणि त्यांच्या छोट्या छोट्या स्वप्नांना पुन्हा एकदा जवळून पाहण्याची संधी देणारा हा चित्रपट आहे. कारण प्रत्येक मुलाच्या मनात एक स्वप्न असतं.

या चित्रपटात प्रभाकर मोरे, कृष्णराज वाईंगडे, सेजल कोरे, अमृता सुरेश, डॉ. सोनाली घाटणेकर इ. कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. 'चिकिझिंग' यंदाच्या दिवाळीत, 12 नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात... एक गोष्ट मुलांच्या स्वप्नांची… आणि मोठ्यांना पुन्हा एकदा त्यांचं बालपण आठवून देणारी.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20: 'बिग बॉस 20'चं वातावरण तापलं; 2-4 नाही, थेट 11 स्पर्धक नॉमिनेट, काझी तौकीर अन् माही विजवरही एलिमिनेशनची टांगती तलवार
'बिग बॉस 20'चं वातावरण तापलं; 2-4 नाही, थेट 11 स्पर्धक नॉमिनेट, काझी तौकीर अन् माही विजवरही एलिमिनेशनची टांगती तलवार
Shruti Marathe Reply Vidyadhar Joshi Kalavant Dhol Tasha Pathak: ढोलपथकातील कलाकार.... विद्याधर जोशींच्या 'त्या' खोचक पोस्टवर श्रुती मराठे संतापली, रिप्लाय देत म्हणाली, 'बाप्पा घरी बसून....'
ढोलपथकातील कलाकार.... विद्याधर जोशींच्या 'त्या' खोचक पोस्टवर श्रुती मराठे संतापली, रिप्लाय देत म्हणाली, 'बाप्पा घरी बसून....'
Sayaji Shinde: वृक्ष लागवडीसाठी कायद्याचे बंधन कशाला? वन जमिनीवरील झालेले अतिक्रमण वन विभागाला दिसत नाही का? सयाजी शिंदे यांचा प्रशासनाला उद्विग्न सवाल, म्हणाले...
वृक्ष लागवडीसाठी कायद्याचे बंधन कशाला? वन जमिनीवरील झालेले अतिक्रमण वन विभागाला दिसत नाही का? सयाजी शिंदे यांचा प्रशासनाला उद्विग्न सवाल, म्हणाले...
Ajay Devgn Drishyam The Conclusion Free Pav Bhaji: 'दृश्यम 3' पाहणाऱ्यांसाठी फ्री पावभाजी; 2 ऑक्टोबरला खास ऑफर, काय करावं लागणार?
'दृश्यम 3' पाहणाऱ्यांसाठी फ्री पावभाजी; 2 ऑक्टोबरला खास ऑफर, काय करावं लागणार?
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Deepak Chahar bat got stolen: भारतीय क्रिकेटपटूच्या तीन महागड्या बॅट मैदानातून चोरीला गेल्या, म्हणाला, मी आता थेट मोदी किंवा योगींना....
भारतीय क्रिकेटपटूच्या तीन महागड्या बॅट मैदानातून चोरीला गेल्या, म्हणाला, मी आता थेट मोदी किंवा योगींना....
Tata : टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, दोन कंपन्यांच्या विलिनीकरणाचं नियोजन सुरु
टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, विलिनीकरणाचा डाव टाकणार
MLAs Respect Mandatory Rules : आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
Satara: सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी साताऱ्यात घडामोडींना वेग, नेत्यांच्या भेटीगाठी सुरुच, शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतली उदयनराजेंची भेट 
सातारा जिल्हा बँकेसाठी नेत्यांच्या भेटीगाठी सुरु,शिवेंद्रराजेंनी घेतली उदयनराजेंची भेट, निवडणूक महायुती म्हणून लढण्यावर एकमत
MPSC कडून 3 ऑक्टोबरची राज्य सेवा मुख्य परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय , आदित्य ठाकरे राज्यपालांचे आभार मानत म्हणाले... 
MPSC कडून 3 ऑक्टोबरची राज्य सेवा मुख्य परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय , आदित्य ठाकरे राज्यपालांचे आभार मानत म्हणाले... 
Ajay Devgn Drishyam The Conclusion Free Pav Bhaji: 'दृश्यम 3' पाहणाऱ्यांसाठी फ्री पावभाजी; 2 ऑक्टोबरला खास ऑफर, काय करावं लागणार?
'दृश्यम 3' पाहणाऱ्यांसाठी फ्री पावभाजी; 2 ऑक्टोबरला खास ऑफर, काय करावं लागणार?
सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त
सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
Embed widget