chhaava movie: राज्यासह देशभरात सध्या 'छावा' (chhaava movie) सिनेमाची क्रेझ दिसून येत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती आधारित असलेल्या या सिनेमाने अगदी लहानांपासून ते वयोवृध्द प्रेक्षकांच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. बॉक्स ऑफिसवर यश मिळवण्याबरोबरच 'छावा' (chhaava movie) सिनेमाच्या पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षक भावूक झाल्याचं चित्र दिसून येत आहे. या चित्रपटातील अंगावरती शहारे आणणारे काही व्हिडिओ, डॉयलॉग सध्या सोशल मिडियावरती धुमाकूळ घालत आहेत. अशातच एका चिमुकल्याचा 'छावा' (chhaava movie) चित्रपट पाहिल्यानंतर केलेल्या एका कृतीच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर या चिमुकल्याच्या डोळ्यातील अश्रू थांबत नसल्याचं दिसत आहे आणि सिनेमा संपल्यानंतर थिएटरमध्येच छत्रपती संभाजी महाराजांना चिमुकल्याने गारद म्हणून मानवंदना दिली, त्यानंतर 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा घोषणाही केली, हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवरती व्हायरल होत आहे. त्याचबरोबर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.


चिमुकल्याला अश्रू अनावर


'छावा' सिनेमा पाहिल्यानंतर चिमुकल्याला अश्रू अनावर झाले. सिनेमा संपल्यानंतर या चिमुकल्याने थिएटरमध्येच गारद म्हणून महाराजांना मानवंदना दिली आहे. यावेळी त्याने छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या. चिमुकल्याचा थिएटरमधील हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नसल्याचं दिसत आहे. 'छावा' पाहिल्यानंतर भावुक झालेल्या या चिमुकल्याच्या व्हिडिओवर नेटकरीही प्रतिक्रिया देत आहेत. आत्तापर्यंत 867,837 इतके लाईक या व्हिडिओला मिळाले आहेत, तर जवळपास 8 मिलियन लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.




छावा चित्रपटाला मिळतोय चांगला प्रतिसाद


लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शीत केलेल्या 'छावा' चित्रपटाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळतो आहे. अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिका साकारली आहे. अक्षय खन्नाने या सिनेमात औरंगजेबाची भूमिका केली आहे, अक्षय खन्नाच्या अभिनयाचं लोक विशेष कौतुक करताना दिसत आहेत. या सिनेमात मराठी कलाकारांची फौज आहे. संतोष जुवेकर, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये, नीलकांती पाटेकर, शुभंकर एकबोटे या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'छावा' सिनेमाने तीनच दिवसांत संपूर्ण जगभरात 121 कोटींचा गल्ला केला आहे. 


'छावा'ची कमाई विक्की कौशलच्या कारकिर्दीतील एकूण 6 फ्लॉप चित्रपटांच्या कमाईपेक्षा जास्त झाली आहे. याशिवाय, 'छावा' विक्की कौशलच्या आजवरच्या फिल्म्सपैकी सर्वात मोठी ओपनिंग फिल्म ठरला आहे. त्यासोबतच सर्वात मोठा वीकेंड ओपनर चित्रपट बनला आहे. फिल्म उरी- द सर्जिकल स्ट्राईकच्या लाईफटाईम कलेक्शनच्या मागे आहे. चित्रपटाच्या कमाईचा वेग पाहता 'छावा' तुफान कमाई करणार यात काही शंका नाही.