मुंबई : शिवसेना ठाकरे गटाला (Shiv Sena Thackeray Group) धक्क्यांवर धक्के बसत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ठाकरे गटातील अनेक पदाधिकरी पक्ष सोडून शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena Shinde Group) प्रवेश करत आहेत. नुकतान माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी ठाकरे गटाला राम राम करत शिंदे गटात प्रवेश केला आहे. आता त्यांच्यानंतर मुंबईतील वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जानावळे (Jitendra Janawale) यांनी शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा दिला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल हे चिन्ह मिळाल्यानंतर पहिली मशाल घेऊन शिवसैनिक जितेंद्र जानावळे हे मातोश्रीवर आले होते. विभाग प्रमुख अनिल परब यांनी आपल्याला कार्यक्षेत्राच्या बाहेर ठेवल्याचा आरोप करत जानावळे यांनी उद्धव ठाकरे यांना राजीनामा पत्र लिहलं आहे. 

Continues below advertisement

पक्षामध्ये जाणून बुजून डावलले जात होते

मागील सहा वर्षे कार्यक्षेत्राच्या बाहेर नियुक्ती करून राजकीय गोची करण्याचे षडयंत्र केल्याचा आरोप देखील जानावळे यांनी केला आहे. विभाग प्रमुख अनिल परब यांनी आपल्याला कार्यक्षेत्राच्या बाहेर ठेवल्याचा उल्लेख त्यांनी राजीनामा पत्रात केला आहे. आपल्याला पक्षामध्ये जाणून बुजून डावलले जात असून यासंबंधीची व्यथा मांडून सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने अनेक क्षमता असताना सुद्धा डावलले जात आहे. त्यामुळं आपण राजीनामा देत असल्याचे जितेंद्र जानावळे यांनी पत्रात लिहिलं आहे. 

जितेंद्र जानावळेंनी पत्रात नेमकं काय म्हटलं?

गेल्या सहा वर्षापासून मला माझ्या कार्यक्षेत्राच्या बाहेर नियुक्त करुन माझी राजकी गोची केली जात असल्याचे जानावळे यांनी पत्रात म्हटलं आहे. गेल्या पालिका निवडणुकीत नोकरी घर सोडून मी भाजपच्या विरोधात निवडणूल कढवली होती. थोड्या मतांनी हरलो पण खचलो नाही. जिद्दीने परत संघटनेचे रुग्णसेवेचे काम सुरु ठेवले. डोक्यात एकच होते की विले पार्ले वॉर्ड 71 मध्ये एकदा तरी विजयाचा भगवा फडकवणार. पण दुर्दैवाने विभागप्रमुख अनिल परब यांनी मला या विधानसभेच्या बाहेर ठेवलं. त्यांना याबाबत वारंवार विभागात घेण्याची विनंती केली. पण त्यांनी फक्त तारखाच दिल्याचे जानावळे यांनी म्हटलं आहे. जाणून बुडून मला डावलण्याचे प्रयत्न होत होते, तरीदेखील मी गप्प बसलो असे त्यांनी पत्रात म्हटलं आहे.  

Continues below advertisement

साहेब याबाबत मी आपल्याला, आदित्य साहेबांना प्रत्यक्ष भेटून विभागात चाललेल्या संघटनात्मक पद्धतीची व्यथा मांडली होती. परंतू आपणही काहीच तोडगा काढला नाही. आंदोलनात पुढे असणारा, पोलिसांच्या लाठ्या खाणारा, आंदोलनाच्या केसेसमध्ये कोर्टात फेऱ्या मारणारा, संघटनात्मक आणि सामाजिक काम करणाऱ्या शिवसैनिकावर जर ही परिस्थिती येत असेल तर नेमका निकष काय लावणार? असा सवाल त्यांनी केला. संघटनेतील चुकीच्या पद्धतीला मी कंटाळलो आहे. मला कोणाच्या दबावाखाली शिवसैनिकत म्हणून काम करायला जमणार नाही. माझी क्षमता असतानाही मला डावल्याण आले, हे मी किती दिवस सहन करायचे. त्यामुळं मी माझ्या उपविभाग प्रमुखपदाचा राजीनामा देत असल्याचे जानावळ म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Rajan Salvi Resigned Shivsena UBT: मातोश्रीशी इमान राखलेल्या निष्ठावंताचा रामराम, राजन साळवींचा राजीनामा, उद्धव ठाकरेंची साथ सोडणार