Chhaava Box Office Collection Day 18: छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) पुत्र छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जीवनावर आधारित 'छावा' चित्रपट (Chhaava Movie) प्रदर्शित होऊन आज 18 दिवस झालेत. या चित्रपटानं सतराव्या दिवशी म्हणजेच, तिसऱ्या रविवारी कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम मोडले आणि 24.30 कोटी रुपये कमावले. दरम्यान, काल (सोमवार)आठवड्याचे दिवस सुरू झाल्यामुळे चित्रपटाच्या कमाईत घट दिसून येत आहे. 

Continues below advertisement

असं असूनही, चित्रपट पाहण्यासाठी अजूनही मोठ्या संख्येनं प्रेक्षक येत आहेत. अशातच आठवड्याच्या पहिल्या दिवसाचे चित्रपटाच्या कमाईशी संबंधित सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत, सोमवारी सकाळी 10:45 वाजेपर्यंत चित्रपटानं किती कमाई केली? हे सविस्तर जाणून घेऊयात... 

'छावा' चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिलेल्या 17 दिवसांच्या अधिकृत आकडेवारीनुसार, चित्रपटानं 471.56 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाच्या कमाईशी संबंधित आजचे आकडे सॅकनिल्कनं दिलेल्या वेबसाईटनुसार आहेत. दरम्यान, हे आकडे अंतिम नाहीत. यामध्ये बदल होऊ शकतात. 

दिवस कमाई (कोट्यवधींमध्ये)
पहिला दिवस 33.1
दुसरा दिवस 39.3
तिसरा दिवस 49.03
चौथा दिवस 24.1
पाचवा दिवस 25.75
सहावा दिवस 32.4
सातवा दिवस 21.60
आठवा दिवस 24.03
नववा दिवस 44.10
दहावा दिवस 41.1
अकरावा दिवस 19.10
बारावा दिवस 19.23
तेरावा दिवस 25.02
चौदावा दिवस 13.60
पंधरावा दिवस 13.3
सोळावा दिवस 22.5
सतरावा दिवस 24.30
अठरावा दिवस 8.50
एकूण 480.06

'छावा'नं बजेटच्या किती टक्के वसूल केलं? 

'छावा' हा चित्रपट सुमारे 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. आपल्या भांडवलापेक्षा या चित्रपटानं कितीतरी पटीनं जास्त कमाई करून 500 कोटींचा टप्पा गाठण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. हा चित्रपट लवकरच 500 कोटींचा आकडा पार करणार आहे. हा चित्रपट आधीच ब्लॉकबस्टर ठरला आणि त्यानं निर्मात्यांना त्यांच्या बजेटच्या 365 टक्क्यांहून अधिक पैसे दिले आहेत. आता हा चित्रपट 400 टक्के कमाईचा जादुई आकडा कधी ओलांडेल? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान, लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) दिग्दर्शित 'छावा' चित्रपटात विक्की कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आणि अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात रश्मिका मंदाना, विनीत कुमार सिंह आणि आशुतोष राणा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Chhaava Movie Aurangzeb Akshaye Khanna: मांसाहार अन् दारुला शिवायचाही नाही, सतत हातात विणकामाच्या सुया, औरंगजेब नेमकं काय करत होता?