Cannes Film Festival 2023 live updates:'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ला सुरुवात ; वाचा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

Cannes Film Festival : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ला आजपासून सुरुवात होत आहे. या फिल्म फेस्टिव्हलचे सर्व अपडेट्स जाणून घ्या...

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 23 May 2023 10:34 AM
Cannes Film Festival 2033 : सनी लिओन तिच्या कान्स मधल्या पहिल्या वहिल्या लूकने प्रेक्षकांची मन जिंकतेय

Cannes Film Festival 2033 : बॉलीवूडच्या विश्वात सनी लिओनीने स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता तिने तिच्या कारकिर्दीत आणखी एक उंची गाठली आहे. आता 'कान्स 2023'मध्येदेखील अभिनेत्रीने हजेरी लावली आहे. 



Drishyam : अजयच्या 'दृश्यम'चा कोरिअन भाषेत होणार रिमेक; 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'दरम्यान घोषणा

Drishyam Franchise Remake In Korea : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि तब्बूचा (Tabu) बहुचर्चित 'दृश्यम' (Drishyam) या सिनेमासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. 'दृश्यम'च्या हिंदी रिमेकने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला होता. आता या सिनेमाचा कोरिअन (Korea) भाषेत रिमेक होणार आहे. 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'दरम्यान (Cannes Film Festival 2023) ही घोषणा करण्यात आली आहे. 

'Cannes 2023'मध्ये मृणाल ठाकूरचा फ्यूजन लूक

'Cannes 2023'मध्ये मृणाल ठाकूरचा फ्यूजन लूक पाहायला मिळाला. तिचा हटके लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला. 





Aishwarya rai Bachchan red carpet look : तुझ्यापेक्षा तुझा सासरा बरा... कान रेड कार्पेटवरील लूकमुळे ट्रोल होतेय ऐश्वर्या

Aishwarya rai Bachchan red carpet look- अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. तिचा कान फिल्म फेस्टिव्हल 2023चा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याला एक नवीन ट्विस्ट मिळाला आहे. लोक तिची तुलना तिचे सासरे अमिताभ बच्चन यांच्या जुन्या फोटोशी करू लागले आहेत.


'Cannes 2023'मधील ऐश्वर्या रायचा लूक बघून विवेक अग्निहोत्री भडकले; ट्वीट करत म्हणाले...

Cannes 2023 : 'Cannes 2023'मधील ऐश्वर्या रायचा लूक बघून विवेक अग्निहोत्री भडकले आहेत. ट्वीट करत त्यांनी लिहिलं आहे,"तुम्ही ‘पोशाख गुलाम’ हा शब्द ऐकला आहे का? त्या बहुतेक मुली असतात. तुम्ही त्याला आता भारतातील जवळपास प्रत्येक महिला सेलिब्रिटींबरोबर पाहू शकता. अशा अस्वस्थ फॅशनसाठी आपण इतके मूर्ख आणि दडपशाही का बनत आहोत?’ ऐश्वर्या रायने परिधान केलेल्या गाऊन मागून एवढा मोठा होता की त्याला सांभाळण्यासाठी एक माणूस उभा होता. यावरुनच अग्निहोत्रींनी टीका केली आहे.

Manushi Chhillar : 'कान्स 2023'मधील मानुषी छिल्लरच्या लूकने वेधलं लक्ष

Manushi Chhillar : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'मध्ये मानुषीने परिधान केलेला व्हाइट गाऊन खूपच कमाल होता. हा गाऊन इटालिअन सिल्क आणि ट्यूलच्या 100 लेअर्सनी बनवला होता. हातमागावर हा गाउन बनवण्यात आला आहे. या गाऊनवर नाजूक नक्षीकाम करण्यात आलं होतं. हा गाउन बनवायला डिझायनरला तब्बल 800 तास लागले आहेत. 





Cannes 2023: ऐश्वर्यानं कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी केलेल्या लूकची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; म्हणाले, 'चिकन शोरमा ..'

Cannes Film Festival 2023:  'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ला (Cannes Film Festival 2023)  16 मे पासून सुरुवात झाली आहे. 76 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक सेलिब्रिटींनी रेड कार्पेटवर वॉक केला. कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी सेलिब्रिटींनी केलेल्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं. कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच 18 मे रोजी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननं (Aishwarya Rai Bachchan)  रेड कार्पेटवर वॉक केला.  ऐश्वर्यानं कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी केलेल्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. काही नेटकऱ्यांनी ऐश्वर्याच्या या लूकला ट्रोल केलं आहे. 



Cannes Film Festival 2033 : कान्स आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलच्या चित्रपट बाजार विभागासाठी राज्य सरकारकडून तीन सिनेमांची एन्ट्री

Cannes Film Festival 2033 : कान्स आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलच्या चित्रपट बाजार विभागासाठी राज्य सरकारकडून तीन सिनेमांची निवड करण्यात आली आहे. यात 'ह्या गोष्टीला नावच नाही', 'टेरीटेरी', 'मदार' या सिनेमांचा समावेश आहे. 


Cannes Film Festival 2033 : 'कान्स 2023'च्या रेड कार्पेटवर राज्य करण्यासाठी भारतील सेलिब्रिटी सज्ज

Cannes Film Festival 2033 : बहुप्रतिक्षित 'कान्स 2023' अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे आणि चाहत्यांनी आधीच त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींचे कान्स चे अपडेट बघण्यासाठी सुरूवात केली आहे. कान्स फेस्टिव्हलमध्ये त्यांच्या फॅशन सोबत कान्स चा रेड कार्पेट या अभिनेत्री अनुभवत आहेत.  सनी लिओनी पासून ते आदिती राव हैदरी ते नवोदित अनुष्का शर्मा, सारा अली खान, या वर्षीच्या यादीत जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अभिनेत्री आहेत. 

Cannes Film Festival 2023: मानुषीचा क्लासी लूक

Cannes Film Festival 2023:  माजी मिस इंडिया मानुषी छिल्लर हिनं देखील या वर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये डेब्यू केला. मानुषीनं कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी क्लासी लूक केला होता.  व्हाईट ड्रेस आणि गळ्यात स्टोनचा नेकलेस असा लूक मानुषीनं कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी केला होता. 



Cannes 2023 : ऐश्वर्या राय लेकीसह कान्सला रवाना

Cannes 2023 : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय लाडक्या लेकीसह 'कान्स 2023'साठी फ्रान्सला रवाना झाली आहे. आता अभिनेत्रीला रेड कार्पेटवर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

'Cannes 2023'मध्ये सारा अली खानचा देसी अंदाज

Cannes 2023 : 'कान्स चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सारा अली खानचा देसी अंदाज पाहायला मिळाला. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सारा अली खानने फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाईन केलेला आऊटफिट परिधान केला होता. 





Cannes Film Festival 2023 : रुबेन ऑस्टलंड 76 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरी अध्यक्षपदी

Cannes Film Festival 2023 : रुबेन ऑस्टलंड यांची 76 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

Cannes Film Festival 2023 ज्या ठिकाणी होणार आहे, तिथे अभिनेत्री कॅथरीन डेन्यूव्हचे मोठे पोस्टर लावण्यात आलं आहे

Cannes Film Festival 2023 ज्या ठिकाणी होणार आहे, तिथे अभिनेत्री कॅथरीन डेन्यूव्हचे मोठे पोस्टर लावण्यात आलं आहे. पाहा पोस्टर-





Jeanne Du Barry ही आहे कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 ची ओपनिंग फिल्म

Jeanne Du Barry ही फिल्म  कान्स फिल्म फेस्टिव्हल  2023 ची ओपनिंग फिल्म आहे. यामध्ये  जॉनी डेपनं प्रमुख भूमिका साकारली आहे.





Cannes Film Festival 2023 : कान्स फिल्म फेस्टिव्हल पाहता येणार लाईव्ह

Cannes Film Festival 2023कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 हे  Festival de Cannes या युट्यूब चॅनलवर प्रेक्षकांना लाईव्ह पाहता येणार आहे. 





Cannes Film Festival 2023 : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'चा ड्रेस कोड काय आहे?

Cannes Film Festival 2023 : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'मध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी खास ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे. तसेच या ड्रेस कोडचे काटेकोरपणे पालन करावे लागेल, असे सांगण्यात आले आहे. महिला कॉकटेल ड्रेस परिधान करू शकतात. ब्लॅक टॉप, ब्लॅक ट्राउजर किंवा भडक रंगाची फॉर्मल ट्राउजर महिला परिधान करू शकतात. तर दुसरीकडे या परुषांना डिनर जॅकेट किंवा सूट परिधान करावे लागतील. तसेच या ड्रेसवर शूजदेखील घालावे लागणार आहेत.

Cannes Film Festival 2023 : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023' कुठे पार पडत आहे?

Cannes Film Festival 2023 : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'चं आयोजन फ्रान्समधील फ्रेंच रिवेरा येथे करण्यात आलं आहे. या फेस्टिव्हलमध्ये अनेक चांगल्या दर्जाचे सिनेमे दाखवले जाणार आहेत. या फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर अनेक सेलिब्रिटी आपल्या अदांनी सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसतील. 

Cannes 2023: अनुराग कश्यपच्या 'केनेडी' चित्रपटाचे स्क्रिनिंग होणार कान्स 2023 मध्ये

Cannes 2023:  अनुराग कश्यपच्या 'केनेडी' चित्रपटाचे स्क्रिनिंग  24 मे रोजी 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023' मध्ये होणार आहे. 





पार्श्वभूमी

Cannes Film Festival : जगभरातील सिनेप्रेमींसाठी महत्त्वाचा असणाऱ्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ला (Cannes Film Festival 2023) आजपासून सुरुवात होत आहे. 76 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. 16 मे ते 27 मे या कालावधीत कान्स फिल्म फेस्टिव्हल पार पडणार आहे.


'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023' कुठे पार पडणार?


'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'चं आयोजन फ्रान्समधील फ्रेंच रिवेरा येथे होणार आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक सिनेमे दाखवले जाणार आहेत. या फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर अनेक सेलिब्रिटी आपल्या अदांनी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.  16 मे 2023 पासून यंदाचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल' सुरू होणार आहे. 16 मे पासून सुरू होणारा हा फेस्टिव्हल 27 मे पर्यंत सुरू राहणार आहे. 


सेलिब्रिटींशिवाय पत्रकार आणि चित्रपट समीक्षकही कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होऊ शकतात. मात्र, त्यासाठी त्यांना लाखो रुपये खर्च करुन तिकीट काढावे लागणार आहे. महोत्सवात सहभागी होण्यासाठीची तिकीटाची किंमत पाच लाख ते 20 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलच्याच्या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन तिकीट बुक करता येते. 


जगातील सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलची सर्वांना उत्सुकता आहे. 16 मेपासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात जगभरातील अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. बॉलीवूड सिनेसृष्टीतील ऐश्वर्या राय बच्चन आणि दीपिका पदुकोण दरवर्षी या महोत्सावाला हजेरी लावत असतात. यावर्षी अनुष्का शर्मा यावर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण करणार आहे.  अनुष्कासह हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री केट विन्सलेटदेखील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहे.तसेच मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री मानुषी छिल्लरदेखील कान्सच्या रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवताना दिसणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीदेखील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहे. सनी पहिल्यांदाच कान्समध्ये सहभागी होणार आहे. बॉलिवूडचा लोकप्रिय सिने-दिग्दर्शक अनुराग कश्यप कान्समध्ये हजेरी लावणार आहे.


'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'मध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी खास ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे. तसेच या ड्रेस कोडचे काटेकोरपणे पालन करावे लागेल, असे सांगण्यात आले आहे. महिला कॉकटेल ड्रेस परिधान करू शकतात. ब्लॅक टॉप, ब्लॅक ट्राउजर किंवा भडक रंगाची फॉर्मल ट्राउजर महिला परिधान करू शकतात. तर दुसरीकडे या पुरुषांना डिनर जॅकेट किंवा सूट परिधान करावे लागतील. तसेच या ड्रेसवर शूजदेखील घालावे लागणार आहेत.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.