Brahmastra : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) स्टारर ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे शूटिंग तब्बल गेल्या पाच वर्षांपासून सुरु होते. दरम्यान नुकतेच रणबीर आणि आलिया वाराणसीच्या रस्त्यांवर शूटिंग करताना दिसले होते. चित्रपटाचा दिग्दर्शन अयान मुखर्जी (Ayan Mukerji) याने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अखेर चित्रीकरण पूर्ण झाल्याचे जाहीर केले आहे.


‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचा निर्माता करण जोहरने (Karan Johar) सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्याने सांगितले की, ब्रह्मास्त्र चित्रपटाचे शूटिंग संपल्याचे म्हटले आहे.


 





आलिया-रणबीर वाराणसीमध्ये!


बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर त्यांच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बराच काळ व्यस्त होते. या चित्रपटाशी संबंधित अनेक पोस्टर सोशल मीडियावर समोर आले होते. आता पुन्हा एकदा या चित्रपटाशी संबंधित बातमी समोर आली आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या पॅचवर्कसाठी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट नुकतेच वाराणसीला पोहोचले होते.


चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने रणबीर-आलियाने वाराणसीला तिसऱ्यांदा भेट दिली. त्यांच्यावर चित्रित होणार्‍या गाण्यांचे काही भाग अद्याप चित्रित व्हायचे होते, जे आता पूर्ण झाले आहेत. त्याचवेळी आलिया भट्टने आणि अयान मुखर्जी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर करताना शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे.


पाहा खास पोस्ट :



दोघेही चित्रपटाच्या संपूर्ण स्टारकास्टसह गंगा घाटावर बोटीत बसून आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. पोस्टच्या सोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'आणि शेवटी... हा रॅप-अप आहे! आम्ही ब्रह्मास्त्रावर पहिला शॉट घेतल्यानंतर 5 वर्षांनी, आम्ही आमचा शेवटचा शॉट शूट केला आहे! पूर्णपणे अविश्वसनीय, आव्हानात्मक, आयुष्यभराचा प्रवास!!!'.


‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची घोषणा ऑक्टोबर 2017मध्ये झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2018मध्ये त्याचे शूटिंग सुरू झाले. याआधी जून आणि नंतर सप्टेंबर 2019 मध्ये या चित्रपटाचे शूटिंग वाराणसीमध्ये झाले होते. या चित्रपटाद्वारे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या दोघांशिवाय अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), मौनी रॉय (Mouni Roy), अक्किनेनी नागार्जुन (Nagarjun Akkineni) या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha