Tina Dabi : आयएएस अधिकारी टीना दाबी (Tina Dabi) पुन्हा एकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आल्या आहे. राजस्थान बॅचचे आयएएस अधिकारी प्रदीप गावंडे (IAS Dr. Pradeep Gawande) यांच्यासोबत ती पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहे. खुद्द टीना दाबी यांनी सोशल मीडियावर इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. टीना यांनी त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, पुन्हा लग्न करणार असल्याचे सांगितले आहे. टीना दाबी आता एका मराठमोळ्या आयएएस अधिकाऱ्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे.
कोण आहेत प्रदीप गावंडे?
टीना दाबी यांचे होणारे पती प्रदीप गावंडे राजस्थान केडरचे 2013 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. प्रदीप यांच्याबद्दल बोलायचे झाले, तर ते सध्या जयपूरमध्ये तैनात आहे. टीना दाबी या देखील जयपूरमध्येच आपली सेवा देत आहेत. प्रदीप गावंडे हे टीना दाबी यांच्यापेक्षा तीन वर्षांनी सिनिअर आहेत. तर, दोघांच्या वयात देखील खूप अंतर आहे.
2013मध्ये प्रदीप यांनी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. प्रदीप गावंडे हे मूळचे महाराष्ट्रातील असून, ते डॉक्टर देखील आहे. प्रदीप गावंडे यांचा जन्म 9 डिसेंबर 1980 रोजी महाराष्ट्रात झाला. प्रदीप यांनी एमबीबीएसची पदवी मिळवली आणि नंतर यूपीएससी उत्तीर्ण केली. ते चुरू जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. एका वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार ते जयपूरमधील स्टेट हेल्थ अॅश्युरन्स एजन्सीचे सीईओ आहेत आणि राजस्थान मेडिकल सर्व्हिसेस कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये एमडी देखील आहेत. तर, त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरील माहितीनुसार, डॉ. प्रदीप गावंडे हे सध्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय राजस्थान येथे संचालक म्हणून कार्यरत आहेत.
टॉपर टीना दाबीचं खास मराठी कनेक्शन!
IAS टीना दाबी या आता मराठमोळ्या अधिकाऱ्याशी विवाह बंधनात अडकणार आहेत. योगायोग म्हणजे टीना यांची आई हिमानी दाबी देखील मराठी कुटुंबातील आहे. त्या महाराष्ट्रातील कांबळे कुटुंबातून आहेत. त्यांचे आजोबा माधवराव कांबळे हे त्यांच्या काळात स्टेशन मास्तर होते. इतकेच नाही तर, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीवर चालणारे हे कांबळे कुटुंब, त्यांच्यासोबत अनेक लढ्यातही सामील होते.
हेही वाचा :
- Viral Video : रिल्स बनवणारी 'ही' सुंदर तरुणी आहे IAS अधिकारी, रील्स बनवण्याचं वेड, पाहा व्हिडिओ
- Tina Dabi : IAS टीना दाबी पुन्हा घेणार सात फेरे, पाहा कोण आहे जोडीदार?
- Bharat Bandh : भारत बंदचा दुसरा दिवस, पहिल्या दिवशी काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत; आरोग्य सेवांवर परिणाम नाही
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha