एक्स्प्लोर

Box Office Collection: पहिल्याच आठवड्यात 'कॉकटेल 2'ची कमाई अडखळली; इम्तियाज अलीच्या 'में वापस आऊंगा’चा धुरळा; कोणी किती कमावले?

पहिल्या वीकेंडमध्ये चांगली कमाई केल्यानंतर ‘कॉकटेल 2’ आता वीकडेजच्या कमाईची वाट काहीशी अडखळताना दिसत आहे.

Box Office Collection: शाहिद कपूर, कृती सेनन आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘कॉकटेल 2’ (Cocktail 2) या चित्रपटाने कमाईत अवघ्या पाचव्या दिवशीच पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली. रिलीजच्या पाचव्या दिवशीही ' चित्रपटाने फारशी उंच उडी घेतलेली दिसली नाही. दुसरीकडे, इम्तियाज अलीच्या ‘मैं वापस आऊंगा’ (Main Vapas Aayunga) या चित्रपटाने 12व्या दिवशीही कमाईत प्रचंड वाढ नोंदवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. जाणून घेऊया कोणी किती कमाई केली..(Box Office Collection)

‘कॉकटेल 2’ला वीकडेजचा फटका

पहिल्या वीकेंडमध्ये चांगली कमाई केल्यानंतर ‘कॉकटेल 2’ आता वीकडेजच्या कमाईची वाट काहीशी अडखळताना दिसत आहे. करोनानंतर मल्टिप्लेक्समध्ये प्रत्येक मंगळवारी सवलतीच्या दरात तिकीट मिळत असतानाही या चित्रपटाला त्याचा अपेक्षित फायदा मिळालेला नाही. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, मंगळवारी देशभरात ‘कॉकटेल 2’चे एकूण 9,565 शो लावण्यात आले होते. मात्र थिएटर्समध्ये केवळ 16 टक्के ऑक्युपन्सी नोंदवली गेली. म्हणजे 100 पैकी तब्बल 84 सीट्स रिकाम्या होत्या.

‘कॉकटेल 2’ची पाच दिवसांची कमाई

सोमवारी चित्रपटाने 6.75 कोटी रुपये कमावले. तर मंगळवारी ही कमाई किंचित घटून 6.65 कोटी रुपये झाली.

 शुक्रवार - 13.50 कोटी
 शनिवार - 16.25 कोटी
 रविवार - 17.75 कोटी
सोमवार - 6.75 कोटी
 मंगळवार - 6.65 कोटी

यासह चित्रपटाची भारतातील एकूण नेट कमाई 60.90 कोटींवर पोहोचली असून ग्रॉस कलेक्शन 72.75 कोटी झाले आहे. चित्रपटाचे बजेट सुमारे 150 कोटी असल्याने अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे.

वर्ल्डवाइड 100 कोटींच्या उंबरठ्यावर

विदेशातही ‘कॉकटेल 2’ने ठीकठाक कामगिरी केली आहे. पाचव्या दिवशी ओव्हरसीज मार्केटमध्ये 1.50 कोटींची कमाई झाली. आतापर्यंत परदेशात एकूण 22.25 कोटींचा व्यवसाय झाला आहे. त्यामुळे चित्रपटाचा एकूण वर्ल्डवाइड ग्रॉस कलेक्शन 95 कोटींवर पोहोचला आहे.

‘मैं वापस आऊंगा’चा बॉक्स ऑफिसवर जलवा कायम

दुसरीकडे, इम्तियाज अली दिग्दर्शित ‘मैं वापस आऊंगा’ हा चित्रपट हळूहळू प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. मंगळवारी या चित्रपटाच्या कमाईत तब्बल 24 टक्क्यांची वाढ झाली. चित्रपटाला मंगळवारी फक्त 2,789 शो मिळाले. मात्र ऑक्युपन्सी तब्बल 41 टक्के नोंदवली गेली, जी ‘कॉकटेल 2’पेक्षा खूपच जास्त आहे. सोमवारी चित्रपटाने 2.50 कोटी कमावले होते. तर मंगळवारी ही कमाई वाढून 3.10 कोटींवर गेली.

‘मैं वापस आऊंगा’ची 12 दिवसांची कमाई

चित्रपटाची भारतातील एकूण नेट कमाई आता 29.85 कोटी झाली असून ग्रॉस कलेक्शन 35.54 कोटींवर पोहोचले आहे. परदेशात या चित्रपटाने आतापर्यंत 12.60 कोटींचा व्यवसाय केला असून एकूण वर्ल्डवाइड कमाई 48.14 कोटी झाली आहे.

इम्तियाज अलीचा चित्रपट ‘मास्टरपीस’ ठरतोय?

चित्रपटाला मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता ‘मैं वापस आऊंगा’ हा इम्तियाज अलीच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा आणि दमदार चित्रपट मानला जात आहे. कमाईच्या बाबतीत जरी हा चित्रपट अजून बजेटच्या तुलनेत मागे असला, तरी भविष्यात तो ‘कल्ट क्लासिक’ ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इतर चित्रपटांची अवस्था बिकट

या दोन चित्रपटांव्यतिरिक्त थिएटर्समध्ये सुरू असलेल्या इतर हिंदी चित्रपटांची स्थिती मात्र फारशी चांगली नाही. विशेषतः कंगना रणौतचा ‘भारत भाग्य विधाता’ आणि मनोज बाजपेयीचा ‘गव्हर्नर’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले आहेत. विक्रम भट्टचा ‘हॉण्टेड 3D: इकोज ऑफ द पास्ट’ बजेट वसूल करण्यात यशस्वी झाला असला तरी आता त्याची कमाई मंदावली आहे. तर वरुण धवनचा ‘है जवानी तो इश्क होना है’ हा चित्रपटही आता थकलेला दिसत आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Veen Doghantli Hi Tutena Samar Swananadi Pregnant: 'आपल्याला बाळ होणार...', समर-स्वानंदीच्या आयुष्यात गोड पाहुण्याची चाहुल? 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत अनोखं वळण, VIDEO
'आपल्याला बाळ होणार...', समर-स्वानंदीच्या आयुष्यात गोड पाहुण्याची चाहुल? 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत अनोखं वळण, VIDEO
Rakul Preet Singh On Surpanakha Character Ramayana Movie: 'शूर्पणखाबद्दल अनेक गैरसमज... तिच्यामुळेच युद्धाची सुरुवात झाली...'; 'रामायण' सिनेमातल्या भूमिकेवर रकुल प्रीत सिंह थेट वक्तव्य, काय म्हणाली?
'शूर्पणखाबद्दल अनेक गैरसमज...'; 'रामायण' सिनेमातल्या भूमिकेवर रकुल प्रीत सिंह थेट वक्तव्य, काय म्हणाली?
Vandana Gupte Video On Aamne Samane Natak Controversy: आपण आर्टिस्ट, कोणी अपमान केलेला तुला सहन होईल का? आमने-सामने नाटकाच्या वादानंतर वंदना गुप्तेंचा लीना भागवत-मंगेश कदमांना प्रेमळ दम, म्हणाल्या...
आपण आर्टिस्ट, कोणी अपमान केलेला तुला सहन होईल का? आमने-सामने नाटकाच्या वादानंतर वंदना गुप्तेंचा लीना भागवत-मंगेश कदमांना प्रेमळ दम, म्हणाल्या...
Rohan Gujar Ketaki Palav Reaction On Leena Bhagwat Video: 'एका वर्षातली नाही, आठ वर्षांतली तिसरी मानधन वाढ...'; लीना भागवतांच्या व्हिडीओनंतर रोहन-केतकीचं महत्त्वाच्या मुद्द्यावर बोट, काय म्हणाले?
'एका वर्षातली नाही, आठ वर्षांतली तिसरी मानधन वाढ...'; लीना भागवतांच्या व्हिडीओनंतर रोहन-केतकीचं महत्त्वाच्या मुद्द्यावर बोट, काय म्हणाले?

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करतातच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करतातच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
Pune Crime News: सारसबागेसमोर 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडलं, कुजून फुगलेला मृतदेह बघून सगळेच हादरले
सारसबागेसमोर 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडलं, कुजून फुगलेला मृतदेह बघून सगळेच हादरले
India vs Pakistan : मोठी बातमी : पाकिस्तानी फलंदाजांनी कृणाल पांड्याला धू-धू धुतला, 23 चेंडूत संपवली मॅच; टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी : पाकिस्तानी फलंदाजांनी कृणाल पांड्याला धू-धू धुतला, 23 चेंडूत संपवली मॅच; टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, नेमकं काय घडलं?
नागपुरात भीषण अपघात! म्हाडाच्या बांधकामस्थळी क्रेन कोसळून दोन मजुरांचा मृत्यू, दोघे जखमी
नागपुरात भीषण अपघात! म्हाडाच्या बांधकामस्थळी क्रेन कोसळून दोन मजुरांचा मृत्यू, दोघे जखमी
Sanjay Gaikwad: शेतकऱ्यांबाबतचं वादग्रस्त वक्तव्य; टीकेची झोड उठताच एकनाथ शिंदेंकडून 'करेक्ट कार्यक्रम? आता संजय गायकवाडांचा यू-टर्न, म्हणाले....
शेतकऱ्यांबाबतचं वादग्रस्त वक्तव्य; टीकेची झोड उठताच एकनाथ शिंदेंकडून 'करेक्ट कार्यक्रम'? आता संजय गायकवाडांचा यू-टर्न, म्हणाले....
Navnath Ban and Nilesh Rane: अरे नवनाथ बन, याद राख, तुला रडायला पण वेळ देणार नाही, तू काय माझा मित्र नाहीस, निलेश राणे यांचा निर्णायक इशारा
अरे नवनाथ बन, याद राख, तुला रडायला पण वेळ देणार नाही, तू काय माझा मित्र नाहीस, निलेश राणे यांचा निर्णायक इशारा
IND vs NZ 4th T20I : तीन सामने खेळल्यानंतर भुवनेश्वर कुमारला बाहेरचा रस्ता, वैभव सूर्यवंशीही OUT, न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या टी-20 साठी भारताची Playing XI जाहीर
तीन सामने खेळल्यानंतर भुवनेश्वर कुमारला बाहेरचा रस्ता, वैभव सूर्यवंशीही OUT, न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या टी-20 साठी भारताची Playing XI जाहीर
Vijay Wadettiwar: भाजपने ठरवून शिंदेसेनेची जिरवणे सुरू केलंय; विजय वडेट्टीवारांचा घणाघात, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी आपली व्यवस्था बरोबर केलीय, सरकार कोसळणार!
भाजपने ठरवून शिंदेसेनेची जिरवणे सुरू केलंय; विजय वडेट्टीवारांचा घणाघात, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी आपली व्यवस्था बरोबर केलीय, सरकार कोसळणार!
Embed widget