एक्स्प्लोर

लष्कर, हवाई अन् नौदल सैनिकांच्या आयुष्याची मांडणी; कुटुंबातील इमोशनल सीन्स, देशभक्तीपर आधारीत बॉर्डर 2 चित्रपट का पाहावा?

Border 2 Movie Review: बॉर्डर 2 एक फुल फॅमिली एंटरटेनर आणि देशभक्ती चित्रपट आहे. जवानांच्या कुटुंबांच्या भावनिक कथा प्रेक्षकांना इमोशनल करतात.

Border 2 Movie Review: 1997 साली प्रदर्शित झालेला बॉर्डर हा एक कल्ट  क्लासिक सिनेमा आहे. हा चित्रपट भारत पाकिस्तान युद्धातील ऐतिहासिक लोंगेवालाच्या लढाईवर  आधारीत आहे.  या देशभक्तीपर चित्रपटात सनी देओल, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ आणि अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत आहेत. भारतीय सैनिकांचे शौर्य आणि संघर्ष यात प्रभावीपणे दाखवण्यात आले आहे.  या चित्रपटाचा सिक्वेल म्हणजेच  बॉर्डर 2 नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तर, काहींनी या चित्रपटाला ट्रोल देखील केलं. बॉर्डर 2 ही एक उत्कृष्ट फिल्म असून,  या चित्रपटात लष्कर, नौदल आणि हवाई दलातील सैनिकांचे आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे.  या चित्रपटात वीर जवानांची कथा सांगण्यात आली आहे. 

या चित्रपटात कुटुंबातील दु:ख, दुरावा आणि आनंदाचे क्षणही दाखवण्यात आले आहे. यामुळे प्रेक्षक काही प्रमाणात इमोशनल होतात.  या चित्रपटातील VFX मुळे प्रेक्षकांचा काही प्रमाणात गोंधळ उडतो. परंतु, चित्रपटातील इमोशन्स, जवानांच्या लढाईंमुळे हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.  

बॉर्डर 2 चित्रपटाची कथा कशावर आधारीत आहे?

बॉर्डर 2 या चित्रपटात  1971 साली प्रदर्शित झालेल्या भारत पाकिस्तान युद्धाची कथा मांडण्यात आली आहे.  पहिल्यांदाच तिन्ही सैनांनी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सने एकत्र युद्ध केले.  या चित्रपटातील कथा अत्यंत भावनिक आहे.  सुरुवातीपासून  हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.  जवानांच्या कुटुंबाच्या कथा अत्यंत भावनिकरित्या मांडल्या आहेत.  हे सीन्स पाहून काही प्रेक्षक भावनिक होतात.  यामुळे आपल्या भारतीय जवानांप्रति गर्व आणि अभिमान वाढतो.   VFX काही ठिकाणी खराब आहेत. पण हा चित्रपट केवळ VFX वर अवलंबून नाही तर, जवानांची वीरता आणि त्यांच्या कथांवर आधारीत आहे.  या सगळ्यापुढे VFX तितकी महत्त्वाची वाटत नाही. 

या चित्रपटात  म्युझिक उत्तमरित्या वापरण्यात आले आहे. काही गाणी कथेला पुढे नेण्यास मदत करतात.  तसेच चित्रपटाला वेगळा आयाम देतात.   पहिला हाफ चित्रपट उत्कृष्ट आहे. सैनिकांच्या कुटुंबातील कथा ह्रदयस्पर्शी आहेत.  VFX चा अधिक वापर नाही. मात्र, दुसरा हाफ पहिल्यापेक्षा थोडा कमी प्रभावी आहे. VFX काही ठिकाणी खटकतात. 

बॉर्डर 2 या चित्रपटात सनी देओल, वरूण धवन, आहान शेट्टी,  मोना सिंह, मेधा राणा, सोनम बाजवा, यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग सिंह यांनी  बॉर्डरची लीगेसी सांभाळून  फिल्म तयार केला आहे.  या चित्रपटातील म्युझिक शानदार आहे.  प्रत्येक गाणं कथेला पुढे नेतं आणि चित्रपटाला वेगळा आयाम देतं. तरीही म्युझिकचा थोडा अधिक वापर केल्यास चित्रपट आणखी प्रभावी होऊ शकलाच असता. हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन नक्की पाहावा. 


रेटिंग - 3.5 स्टार्स

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Marathi Actor On PM Modi Video: 'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
Kirti Kulhari Cyber Fraud : थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक
थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक;

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget