एक्स्प्लोर

Zollywood : 'झॉलीवूड'चा ट्रेलर रिलीज; 3 जूनला सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Zollywood : 'झॉलिवूड' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Zollywood : झाडीपट्टी नाटकाची धमाल दाखवणाऱ्या 'झॉलीवूड' (Zollywood) सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. बऱ्याच राष्ट्रीय-आंतररष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला, पुरस्कारप्राप्त 'झॉलीवूड' हा सिनेमा 3 जून रोजी प्रदर्शित होत आहे. पहिल्यांदाच झाडीपट्टी नाटकाचं खरंखुरं चित्रण या सिनेमात मांडण्यात आलं आहे. 

सिनेमा अस्सल झाडीपट्टीचा अनुभव देईल!

'झॉलीवूड' हा सिनेमा नव्या दमाचा दिग्दर्शक तृषांत इंगळेनं दिग्दर्शित केला आहे. तृषांत या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. झाडीपट्टी नाटकांची विदर्भात प्रचंड लोकप्रियता आहे, त्या भागात झाडीपट्टी ही जणू स्वतंत्र इंडस्ट्रीच आहे. पण उर्वरित महाराष्ट्रात झाडीपट्टीविषयी फारशी माहिती नाही. त्यामुळे 'झॉलीवूड'मधून पहिल्यांदाच झाडीपट्टी सिनेमाच्या रुपात जगभरात पोहोचणार आहे. 'झॉलीवूड' हा सिनेमा बऱ्याच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये दाखवला गेला आहे. राज्य पुरस्कारांमध्येही या चित्रपटानं नामांकनं मिळवली आहेत. 

झाडीपट्टी रंगभूमीवरच्या कलाकारांनीच साकारल्या सिनेमातील भूमिका

झाडीपट्टी रंगभूमीवरच्या कलाकारांनीच या सिनेमातील भूमिका साकारल्या आहेत हे महत्त्वाचं वैशिष्ट्य. झाडीपट्टी नाटक करताना येणाऱ्या अडचणी, नाटकासाठी अभिनेत्री म्हणून मुलगी न मिळणं, नाटकाला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद, नाटक करतानाचे वादविवाद अशी धमाल या सिनेमात असल्याचं ट्रेलरमधून दिसून येतं. मात्र मातीशी जोडलेलं दमदार कथानक, अस्सल विदर्भीय भाषा, खरेखुरे कलाकार या चित्रपटात असल्यानं चित्रपटाला विदर्भीय सुगंध आहे. म्हणून चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आता ३ जूनला चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रतीक्षी आहे.

विशबेरी फिल्म्सच्या प्रियंका अगरवाल, अंशुलिका दुबे, शाश्वत सिंग यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून, अमित मसूरकर आणि डयुक्स फार्मिंग फिल्म्स चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. तर ‘न्यूटन’, ‘शेरनी’, ‘सुलेमानी किडा’ असे दर्जेदार चित्रपट दिग्दर्शित केलेले अमित मसूरकर या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आणि प्रस्तुतकर्ते आहेत. हा चित्रपट नव्या दमाचा दिग्दर्शक तृषांत इंगळेनं दिग्दर्शित केला आहे. 

विदर्भात लोकप्रिय असलेल्या झाडीपट्टी नाटकांविषयी उर्वरित महाराष्ट्रात विशेष माहिती नाही. मात्र, झाडीपट्टी रंगभूमी हा अतिशय खास कलाप्रकार तर आहेच, पण झाडीपट्टी ही जणू एक इंडस्ट्रीच आहे. त्यामुळे 'झॉलीवूड'मधून पहिल्यांदाच झाडीपट्टी चित्रपटाच्या रुपात जगभरात पोहोचणार आहे.

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan: 'सलमान खान अभिनेता नाहीच, तर...'; स्वत:बद्दल भाईजान असं का बोलला? मुंबईत येण्याचा प्रवास उलगडला
'सलमान खान अभिनेता नाहीच, तर...'; स्वत:बद्दल भाईजान असं का बोलला? मुंबईत येण्याचा प्रवास उलगडला
Sachin Pilgaonkar: सचिन पिळगांवकर बनले डॉक्टर, ITM विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट जाहीर; मोठ्या कारकि‍र्दीनंतर विशेष सन्मान
सचिन पिळगांवकर बनले डॉक्टर, ITM विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट जाहीर; मोठ्या कारकि‍र्दीनंतर विशेष सन्मान
Anushka Pimputkar Viral video: तरुणी वृद्ध व्यक्तीच्या जवळ अन्...बसमधील अभिनेत्रीचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, अनुष्का संतापली, म्हणाली 'हे मुद्दाम केलंय'
तरुणी वृद्ध व्यक्तीच्या जवळ अन्...बसमधील अभिनेत्रीचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, अनुष्का संतापली, म्हणाली 'हे मुद्दाम केलंय'
Mitwa Singer Blood Cancer: शाहरुख खानच्या 'मितवा' गाण्याला आवाज देणाऱ्या गायकाला झाला गंभीर आजार, ब्लड कॅन्सरने त्रस्त; स्वत:च दिली हेल्थ अपडेट
शाहरुख खानच्या 'मितवा' गाण्याला आवाज देणाऱ्या गायकाला झाला गंभीर आजार, ब्लड कॅन्सरने त्रस्त; स्वत:च दिली हेल्थ अपडेट

व्हिडीओ

PM Modi Gold Price Drop : मोदींचं आवाहन, सोन्याची घसरण? Special Report ABP Majha
Mann Suddha Tujha Season 3 : नात्यातला दुरावा | मन सुद्ध तुझं | Episode 7 | ABP Majha
Solapur Drought Farmer Special Report : सोलापुरातील दुष्काळाची दाहकता, शेतकऱ्यांचा जीवघेणा संघर्ष
Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate Today: सोन्याच्या दरातील घसरणीला ब्रेक! सोन्याच्या दरात 2500 रुपयांनी वाढ, तर चांदीचा दरही स्थिरावला; दरवाढीमागे अमेरिकेतील महागाईचा संबंध?
सोन्याच्या दरातील घसरणीला ब्रेक! सोन्याच्या दरात 2500 रुपयांनी वाढ, तर चांदीचा दरही स्थिरावला; दरवाढीमागे अमेरिकेतील महागाईचा संबंध?
Bisleri water FSSAI: मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
Mumbai Tree cutting: मोठी बातमी: गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1300 झाडांवर कुऱ्हाड; मुंबई महानगरपालिकेने झाडांवर लटकवल्या नोटीस
मोठी बातमी: गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1300 झाडांवर कुऱ्हाड; मुंबई महानगरपालिकेने झाडांवर लटकवल्या नोटीस
Night Shift Heart Health Risk : नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
Sujay Vikhe Patil : शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
Sanjay Raut and Rahul Narwekar: राहुल नार्वेकरांचा अलिबागमध्ये जमीन खरेदीचा सपाटा, आदिवासींच्या जमिनीवर अतिक्रमणाचा आरोप, संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना धाडलं पत्र
राहुल नार्वेकरांचा अलिबागमध्ये जमीन खरेदीचा सपाटा, आदिवासींच्या जमिनीवर अतिक्रमणाचा आरोप, संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना धाडलं पत्र
Rohit Pawar NCP: शरद पवारांच्या राष्ट्रवादीने रोहित पवारांची 'सैन्यबळाची रसद' तोडली, रोहितच्या आंदोलनात जाऊ नका, पक्षाचा कार्यकर्त्यांना आदेश
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने रोहित पवारांची 'सैन्यबळाची रसद' तोडली, रोहितच्या आंदोलनात जाऊ नका, पक्षाचा कार्यकर्त्यांना आदेश
Maharashtra Live blog updates: राज्यव्यापी रिक्षा संघटनांची आंदोलनाची हाक, रॅपिडोचा विरोधकरत आज रिक्षा सेवा बंद, चाकरमान्यांना फटका बसणार?
Maharashtra Live blog updates: राज्यव्यापी रिक्षा संघटनांची आंदोलनाची हाक, रॅपिडोचा विरोधकरत आज रिक्षा सेवा बंद, चाकरमान्यांना फटका बसणार?
Embed widget