Armaan Malik Second Wife Kritika Malik Pregnant : लोकप्रिय युट्यूबर अरमान मलिक (Armaan Malik) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अरमान मलिक पाचव्यांदा बाबा होणार आहे. आता युट्यूबरच्या दुसऱ्या पत्नीने म्हणजेच कृतिका मलिकने (Kritika Malik) चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.
कृतिका मलिकने चाहत्यांना दिली गुडन्यूज
कृतिका मलिकने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. कृतिका म्हणाली,"तुम्हा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कसं सांगू हे कळत नाही. मी दुसऱ्यांदा आई होणार आहे. हो खरंच मी गरोदर आहे". त्यानंतर अरमान आणि चाहत्यांना ती आनंदाची बातमी देते. कृतिकाने गुडन्यूज दिल्यानंतर चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचं अभिनंदन करत आहेत.
युट्यूबर अरमान मलिकच्या दुसऱ्या पत्नीने अर्थात कृतिका मलिकने 6 एप्रिल 2023 रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीने अर्थात पायल मलिकने (Payal Malik) 26 एप्रिल 2023 रोजी जुळ्या मुलांना जन्म दिला. अरमानच्या दुसऱ्या पत्नीचा अर्थात कृतिकाचा तीन वेळा गर्भपात झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी चाहत्यांना गुडन्यूज दिली. आता पुन्हा एकदा कृतिकाने गुडन्यूज दिली आहे.
अरमान मलिकचं दोन वेळा लग्न झालं आहे. अरमानच्या पहिल्या पत्नीचं नाव पायल आहे. 2011 मध्ये ते लग्नबंधनात अडकले. तर अरमानच्या दुसऱ्या पत्नीचं नाव कृतिका आहे. 2018 मध्ये त्यांनी लग्न केलं आहे. अरमानने पायलआधी 17 वर्षांपूर्वीदेखील लग्न केलं होतं. अरमानच्या त्या पहिल्या पत्नीचं नाव सुमित्रा आहे.
अरमान मलिक कोण आहे? (Who Is Arman Malik)
अरमान मलिक हा एक लोकप्रिय युट्यूबर आहे. सोशल मीडियावर तो चांगलाच अॅक्टिव्ह आहे. वेगवेगळ्या व्हिडीओच्या माध्यमातून तो चांगलेच पैस कमावतो. अरमान मलिकचं खरं नाव संदीप आहे. अरमान त्याच्या दोन्ही पत्नींसोबत एकाच घरात राहतो. अनेकदा तो ट्रोलदेखील होत असतो. याबद्दल एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला होता,"हजारो लोक माझे व्लॉग बघतात. त्यांची विचार करण्याची वृत्ती वेगळी असल्याने ते निगेटिव्ह कमेंट्स करतात. ट्रोलर्सचा मला फरक पडत नाही.
संबंधित बातम्या