Armaan Malik Kritika Malik Baby: प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिक (Armaan Malik) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. कृतिका आणि पायल या आरमानच्या दोन पत्नी आहेत. कृतिका ही अरमानची दुसरी पत्नी असून त्याची पहिली ही पायल आहे. त्यामधी कृतिका मलिकनं (Kritika Malik) नुकत्याच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. अरमाननं सोशल मीडियावर (Social media) पोस्ट शेअर करुन ही गुड न्यूज चाहत्यांना दिली आहे.
अरमान मलिकने इंस्टाग्राम अकाउंटवर त्याच्या कृतिका आणि पायल मलिक या दोन्ही पत्नींचे फोटो शेअर केले. या फोटोमध्ये कृतिका हिरव्या रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये तर पायलही गुलाबी ड्रेसमध्ये दिसत आहे. अरमाननं हा फॅमिली फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'गोलू आई झाली आहे... बाळ आणि आई दोघांची तब्येत चांगली आहे.' अरमाननं शेअर केलेल्या या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
अरमान मलिकची दुसरी पत्नी कृतिकाचा तीन वेळा गर्भपात झाला होता. आता कृतिकानं गूड न्युज दिली आहे. अरमानची पहिली पत्नी पायल मलिक देखील लवकरच गोड बातमी देणार आहे. अरमान आणि त्याची पहिली पत्नी पायल यांना एक मुलगा आहे, ज्याचे नाव चिरायू आहे.
अरमाननं ट्रोलर्सला दिलं होतं सडेतोड उत्तर
काही दिवसांपूर्वी एबीपी न्युजला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरमानला ट्रोलर्सबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अरमान मलिक म्हणाला, 'हजार लोक कमेंट करत असतात. लोक माझे व्लॉग बघतात. ज्यांचे विचार छोटे असतात ते अशा प्रकारचे निगेटिव्ह कमेंट्स करतात. मी माझ्या कुटुंबाचे कोणतेही फोटो शेअर करेल. ट्रोल करणाऱ्यांच्या कमेंट्समुळे मला काहीच फरक पडत नाही. '
कोण आहे अरमान?
अरमान मलिक हा प्रसिद्ध युट्यूबर आहे. तो युट्यूबवर त्याचे व्लॉग अपलोड करतो. अरमाननं पायलसोबत 2011 मध्ये लग्न केले. त्यानंतर त्यानं 2018 मध्ये कृतिकासोबत लग्न केलं. अरमान त्याच्या दोन्ही पत्नींसोबत एकाच घरात राहतो.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: