Riteish Deshmukh: रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) ही मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. रितेश आणि जिनिलिया यांच्या वेड चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली. तसेच या दोघांच्या सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत असते. रितेश आणि जिनिलिया नुकतेच  मुंबईतील एका इव्हेंटमध्ये स्पॉट झाले. या इव्हेंटमधील रितेश आणि जिनिलिया यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर  जिनिलिया ही तिसऱ्यांदा आई होणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. आता या चर्चेवर रितेशनं मौन सोडलं आहे.


मुंबईतील एका इव्हेंटमध्ये रितेश आणि जिनिलिया यांनी हजेरी लावली. यावेळी जिनिलियानं जांभळ्या रंगाचा वनपीस आणि गोल्डन हिल्स असा लूक केला होता. तर रितेश हा व्हाईट शर्ट आणि ब्लू पँट अशी कॅज्युअल लूकमध्ये दिसला. यावेळी जिनिलिया तिच्या पोटावर हात ठेवताना  दिसत होती. मुंबईतील  या इव्हेंटमधील रितेश आणि जिनिलिया  यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल  झालेल्यानंतर रितेश-जिनिलिया तिसऱ्यांदा आई-बाबा होणार का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला. या प्रश्नाचं उत्तर नुकतेच रितेशनं एका इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून दिलं आहे. 


रितेशनं इन्स्टा स्टोरीमध्ये एका आर्टिकलचा स्क्रिनशॉर्ट शेअर केला आहे. यामध्ये लिहिलं आहे की, जिनिलिया प्रेग्नंट आहे? रितेशनं हा आर्टिकलचा स्क्रिनशॉर्ट  शेअर करुन लिहिलं,  'अजून दोन तीन मुलं असायला मला हरकत नाही. पण दुर्दैवाने हे असत्य आहे.'




जिनिलिया आणि रितेश यांनी 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्नगाठ बांधली. दोघांनी 2003 मध्ये आलेल्या तुझे मेरी कसम या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे प्रेमात पडले आणि जवळपास 10 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले.  रितेश आणि जिनिलिया यांना  25 नोव्हेंबर 2014 रोजी रियान हा मुलगा झाला. त्यानंतर त्यांच्या दुसरा मुलगा राहिलचा जन्म 1 जून 2016 रोजी झाला. रितेश आणि जिनिलिया यांच्या वेड या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली आहे.






महत्त्वाच्या बातम्या :


Amchya Papani Ganpati Anla:'मला मोठेपणी रितेश देशमुखसारखं व्हायचंय...'; "आमच्या पप्पांनी गणपती आणला" फेम साईराज केंद्रेनं व्यक्त केली इच्छा