Yodha Movie Review :  मेलेल्याला आणखी किती मारायचं अशी एक म्हण आहे. सध्या पाकिस्तानच्या बाबतीत सिनेसृष्टीचं तसंच सुरु आहे. अशातच आता सध्या आणखी एक चित्रपट आलाय ज्यामध्ये हिरो हा पाकिस्तानचा जावाई तर होतोच पण तो पाकिस्तानसह हिंदुस्थानच्या पंतप्रधानांना देखील वाचवतो. एका विमानाचं हायजॅक तो फेल करतो आणि 170 प्रवाश्यांना सुखरुप वाचवतो. म्हणजेच दोन पंतप्रधान, एक हायजॅक, 170 प्रवासी, बाप रे बाप इतकी हिरोगिरी असूनही या चित्रपटात अजितबात मजा आली नाहीये. 


गोष्ट - ही गोष्ट एका योद्धा नावाच्या टास्कफोर्सची आहे. आता टास्क फोर्स फिल्मी आहे तर ते सगळं करु शकतात. विमान चालवू शकतात आणि संधी मिळाली तर चंद्रावर जाऊन चहा देखील विकू शकतात. सिद्धार्थ मल्होत्राचे वडिल या टास्क फोर्सचे हेड असतात पण ते शहीद होतात आणि त्यानंतर सिद्धार्थ या टास्क फोर्समध्ये सामील होतो. मग एकामागून एक विमान हायजॅकिंग सुरु असतं ज्याला हे फोर्स थांबवू शकत नाही आणि त्यामुळे हे फोर्स बंद करण्याचे आदेश येतात. पण या चित्रपटाचं नावच योद्धा आहे आणि हिरो पण योद्धा आहे, त्यामुळे टास्क फोर्स कसा बंद होणार. असं होऊच शकत नाही, त्यानंतर आणखी एक विमान हायजॅक होतं आणि यावेळी हे प्रकरण पाकिस्तानपर्यंत पोहचतं. सध्या हा देशभक्ती दाखवण्यासाठी बॉलीवूडचा एकमेव आणि फार आवडीचा विषय झालाय. पूर्ण रिव्ह्यु वाचून झाल्यानंतरही हिम्मत होत असेल तर यानंतर पुढे या चित्रपटात काय होतं हे पाहण्यासाठी तुम्ही सिनेमागृहात जाऊ शकतात. 


कसा आहे चित्रपट?


या चित्रपटाची सुरुवात ही त्याच सिनने होते जिथून प्रत्येक बॉलीवूडच्या चित्रपटात एन्ट्री घेतले आहे. हिरो  काही लोकांना वाचवतो आणि ते खूप कंटाळवाणे वाटते. यानंतर चित्रपटात थोडी उत्सुकता निर्माण होते पण नंतर चित्रपटातही तेच घडते जे पाहिल्यानंतर कंटाळा येतो. हिरो पाकिस्तानात पोहचतो आणि दोन्ही देशाच्या पंतप्रधानांना वाचवतो.याचा अर्थ प्रत्येकाला सलमान खान व्हायचे आहे. हिरो विमान तर उडतोवच पण  फ्लाइटमधील एका  क्रू इंटर्नला हे तो विमान उडवायला सांगतो. तो टेक ऑफ करतो आणि विमान क्रॅश होण्याआधीच थांबतो. चित्रपटातील काही सीन्स  अगदी बालिश वाटतात. त्यावर अक्षरश: हसू येतं. असं वाटतं की, देशभक्ती दाखवण्यासाठी आपल्याला पाकिस्तानला मारहाण करण्याशिवाय आपल्याला दुसरं काही करायचंच नाहीये. हा चित्रपट कोणतीही भावना निर्माण करु शकत नाही. 


अभिनय -  सिद्धार्थ मल्होत्राचा अभिनय खूप चांगला आहे. तो अगदी फिटही दिसतोय. पण या चित्रपटाची कथा इतकी मजबूत नाही की तो स्वत:हून आणखी काही मदत करु शकला असता. राशी खन्ना चांगली दिसतेय, तिची भूमिकाही दमदार आहे, पण चित्रपटाची पटकथा बालिश असेल तर ते काय करणार आहे. दिशा पाटनीचा अभिनय अजूनही तितकासा चांगला नाही, त्यामुळे तिच्या अभिनयाविषयी काहीही बोलणार नाही. सनी हिंदुजा दहशतवाद्याच्या भूमिकेत अप्रतिम दिसतोय, अगदी मृदू संदीप भैया इतकी भीती निर्माण करू शकतो असं कुणालाच वाटलं नव्हतं.


दिग्दर्शन - या चित्रपटाचे लेखन सागर आंब्रे यांनी केले असून सागरने पुष्कर ओझासोबत चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहेत आणि हे दोघेही या चित्रपटातील खलनायक आहेत. पाकिस्तानशिवाय आमच्याकडे काहीच उरले नाही का, फक्त पाकिस्तानला हरवून देशभक्ती दिसून येते का, की पाकिस्तान सगळ्यांना सुरक्षित टार्गेट वाटतो का, चित्रपटातील अनेक सीन्स पचनी पडत नाहीत. सिनेमॅटिक लिबर्टी घ्यायला हरकत नाही पण त्याची एक मर्यादा असते. 


एकूणच सिद्धार्थ मल्होत्राच्या चाहत्यांना हा चित्रपट पाहायचा असेल तर ते पाहू शकतात. 


या चित्रपटाला मी देतोय 5 पैकी 2 स्टार्स