Marathi Actress Tejashree Engagement : सध्या सिनेसृष्टीत लगीनघाई सुरू आहे. मागील काही दिवसात मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत कलाकारांनी लग्नगाठ बांधत आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. आता आणखी एका मराठी अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना ही बातमी दिली आहे. अभिनेत्री तेजश्री जाधव (Tejashree Jadhav) हिने प्रियकर रोहन सिंह (Rohan Singh) सोबत साखरपुडा केला आहे.
काही दिवसांपूर्वीच तेजश्रीने प्रेमाची कबुली दिली होती. प्रियकर रोहन सिंहने तिला समुद्र किनाऱ्यावर रोमँटिकपणे प्रपोज करत लग्नाची मागणी घातली होती. याचे फोटो तेजश्रीने शेअर केले होते. चाहत्यांनी या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव करताना शुभेच्छा दिल्या.
तेजश्रीने साखरपुड्यासाठी हिरव्या रंगाची साडी नेसून पारंपरिक लूक कॅरी केला होता. तर रोहनने हिरव्या रंगाचा कुर्ता आणि त्यावर जॅकेट परिधान केले होते. साखरपुड्यातील काही खास क्षणांचे फोटो तेजश्रीने तिच्या सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत.
मराठी, हिंदी चित्रपटांसह ओटीटीवर झळकली तेजश्री
तेजश्री जाधवने 2016 मध्ये सोनाक्षी सिन्हाची प्रमुख भूमिका असलेल्या 'अकिरा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याशिवाय तिने प्रविण तरडे यांच्या 'बलोच' या चित्रपटात काम केले. 2016 मध्येच तिने अट्टी या दाक्षिणात्य चित्रपटात काम केले होते. एमएक्स प्लेयर या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'माधुरी टॉकीज' वेब सीरिजमध्येही तिने काम केले होते.