Google Most Searched Film And Celebrity : 2023 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. गूगलने नुकतीच वेगवेगळ्या विभागांतील 'टॉप सर्च 2023' (TOP 10 Serach 2023) गोष्टींची यादी जाहीर केली आहे. 2023 मध्ये गूगलवर सर्वाधिक सर्च केलेला सिनेमा शाहरुख खानचा 'जवान' (Jawan) आहे. या वर्षात 'जवान' हा सिनेमा गूगलवर सर्वाधिक सर्च केला गेला आहे. जाणून घ्या 2023 मध्ये गूगलवर सर्वाधिक सर्च केले गेलेले 'टॉप 10' सिनेमांबद्दल...
गूगलवर सर्वाधिक सर्च केले गेलेले 'TOP 10 Movies'
1. जवान (Jawan)
2. गदर 2 (Gadar 2)
3. ओपनहायमर (Oppenheimer)
4. आदिपुरुष (Adipurush)
5. पठाण (Pathaan)
6. द केरळ स्टोरी (The Kerala Story)
7. जेलर (Jailer)
8. लियो (Leo)
9. टायगर 3 (Tiger 3)
10. वारिसु (Varisu)
2023 मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध धाटणीच्या, वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या वेबसीरिज प्रदर्शित झाल्या. या सीरिजने प्रेक्षकाचं चांगलच मनोरंजन केलं. फर्जी, स्कॅम 2003, बिग बॉस 17, ताजा खबर अशा अनेक सीरिजनी आणि कार्यक्रमांनी 2023 मध्ये ओटीटी विश्व गाजवलं आहे.
गूगलवर सर्वाधिक सर्च केले गेलेल्या 'TOP 10 Web Series'बद्दल जाणून घ्या...
1. फर्जी
2. वेडनेसडे
3. असुर
4. राणा नायडू
5. द लास्ट ऑफ अस
6. स्कॅम 2003
7. बिग बॉस 17
8. गन्स अॅन्ड गुलाब्स
9. सेक्स लाईफ
10. ताजा खबर
कियारा आडवाणीला केलं गेलं सर्वाधिक सर्च
भारतात 2023 मध्ये कियारा आडवाणी टॉप ट्रेडिंग सेलिब्रिटी ठरली आहे. तर सिद्धार्थ मल्होत्रा या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. 'बिग बॉस ओटीटी 2'चा विजेता एल्विश यादव पाचव्या स्थानावर आहे. सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी सर्वाधिक सर्च केली गेली होती. कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा 2023 मध्ये लग्नबंधनात अडकले. त्यांच्या शाही विवाहसोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या लग्नसोहळ्याची चांगलीच चर्चाही रंगली होती. लग्नसोहळ्यामुळे कियारा आडवाणी 2023 मध्ये सर्वाधिक सर्च केली गेली आहे. कियाराने प्रियंका चोप्रा, आलिया भट्ट, कतरिना कैफ अशा बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकलं आहे.
1. कियारा आडवाणी
2. शुभमन गिल
3. रचिन रवींद्र
4. मोहम्मद शमी
5. एल्विश यादव
6. सिद्धार्थ मल्होत्रा
7. ग्लेन मैक्सवेल
8. डेविड बेकहम
9. सूर्यकुमार यादव
10. ट्रेविस हेड
'टॉप 10' ट्रेडिंग टॉपिक्सबद्दल जाणून घ्या.. (Top 10 Trending Topics 2023)
1. चंद्रयान - 3
2. कर्नाटक इलेक्शन रिझल्ट
3. इस्त्राइल न्यूज
4. सतीश कौशिक
5. बजट 2023
6. तुर्की भूकंप
7. अतीक अहमद
8. मैथ्यू पेरी
9. मणिपुर न्यूज
10. ओदिशा ट्रेन अपघात
संबंधित बातम्या