Hi Nanna Box Office Collection Day 5: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता नानीचा (Nani) 'हाय नन्ना' (Hi Nanna) हा चित्रपट 7 डिसेंबर रोजी रिलीज झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'हाय नन्ना'  हा चित्रपट  रिलीज होऊन पाच दिवस झाले आहेत. या पाच दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 25 कोटींचा टप्पा पार केला आहे.


'हाय नन्ना'नं पाच दिवसात केली एवढी कमाई (Hi Nanna Box Office Collection Day 5)


Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'हाय नन्ना' या चित्रपटाने   4.9 कोटींची ओपनिंग केली होती. तर दुसऱ्या दिवशी  या चित्रपटानं 4.05 कोटींची कमाई केली आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 7.6 कोटींचे कलेक्शन केलं आहे. तसेच चौथ्या दिवशी या चित्रपटाने 8 कोटींची कमाई केली आहे.  पाचव्या दिवशी या चित्रपटानं 1.55 कोटींची कमाई केली आहे. आता या चित्रपटाचं पाच दिवसाचं एकूण कलेक्शन 26.1 कोटी एवढे झाले आहे.






'हाय नन्ना' ची स्टार कास्ट (Hi Nanna Star Cast)


'हाय नन्ना' या चित्रपटामध्ये नानीने सेलिब्रिटी फोटोग्राफर विराजची भूमिका साकारली आहे.  विराज हा त्याच्या सहा वर्षांची मुलगी माहीसोबत मुंबईत राहतो. त्याला आपल्या मुलीसाठी एक परफेक्ट वडील व्हायचे आहे. विराज,  आजोबा (जयराम), पाळीव कुत्रा प्लुटो आणि विराज (नानी)चा मित्र जस्टिन हे सर्वजण माहीचे जवळचे लोक असतात.   या चित्रपटात नानीसोबत अभिनेत्री मृणाल ठाकूरने देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. मृणाल आणि नानी यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीने लोकांची मने जिंकली आहेत. याशिवाय या चित्रपटात अभिनेत्री श्रुती हासनचीही महत्त्वाची भूमिका आहे. शौर्यव यांनी 'हाय नन्ना' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाचं अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन कौतुक केलं आहे.


नानीच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. त्याचा  दसरा हा चित्रपट एप्रिल महिन्यात रिलीज झाला होता. या चित्रपटानं देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटात  किर्ती सुरेशनं देखील प्रमुख भूमिका साकारली होती.


संबंधित बातम्या:


Hi Nanna Twitter Review: मृणाल ठाकूर आणि नानीचा 'हाय नन्ना' जिंकतोय प्रेक्षकांची मनं; नेटकरी म्हणतायत, "हा मास्टरपीस आहे"