एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Year Ender 2017 : जखमी भन्साळी, टायगरची डरकाळी, बॉलिवूडचं वर्ष

हिंदी सिनेमासाठी 2017 हे वर्षं महत्वाचं होतं. या वर्षात अनेक महत्वाचे सिनेमे आले. यामध्ये रईस, काबील, टायगर जिंदा है यांसह गोलमाल अगेन, जुडवा २, टॉयलेट एक प्रेमकथा यांसारखे सिनेमे होते. याशिवाय बरेच छोटे छोट सिनेमे या वर्षाकडे आस लावून बसलेले.

हिंदी सिनेमासाठी 2017 हे वर्षं महत्वाचं होतं. या वर्षात अनेक महत्वाचे सिनेमे आले. यामध्ये रईस, काबील, टायगर जिंदा है यांसह गोलमाल अगेन, जुडवा २, टॉयलेट एक प्रेमकथा यांसारखे सिनेमे होते. याशिवाय बरेच छोटे छोट सिनेमे या वर्षाकडे आस लावून बसलेले. अगदी हरामखोरपासून लिपस्टिक अंडर माय बुरखा, न्यूटन, बरेली की बर्फी असे अनेक आहेत या यादीत. या सगळ्यांसाठी हे वर्षं चांगलं गेलं. या वर्षामध्ये नेहमीप्रमाणे हिंदीत शंभरावर सिनेमे रिलीज झाले.
शाहरूखच्या पोटात आला गोळा 
2017 कडे सगळ्यात जास्त लक्ष होतं ते शाहरूख खानचं. कारण गेल्या वर्षीच्या शेवटी आलेल्या दंगलने चांगली कमाई केली होती. शिवाय त्याच वर्षात आलेल्या सुलताननेही शंभर कोटीचा क्लब गाठला होता. त्यामुळे सलमान, आमीरनंतर शाहरूखचा रईस काय करतो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. त्यात राकेश रोशन निर्मित काबीलचीही तारीख आली. त्यामुळे रईस आणि काबील यामध्ये नेमकं कोण बाजी मारणार याकडे सर्वांच लक्ष होतं. अर्थात शाहरूखच तो त्याने आपला सिनेमा शंभरी पार पोचवला.
कही खुशी कही गम 
2017 मध्ये शंभरी पार केलेल्यांचा आकडा फार नाही. अगदीच ढोबळ अंगाने सांगायचं तर गोलमाल अगेन, रईस, बद्रिनाथ की दुल्हनिया, टायगर जिंदा हे, टॉयलेट एक प्रेमकथा अशा सिनेमांनी मोठी कमाई केली. पण त्यावेळी अनेक छोट्या बजेटच्या सिनेमांनी इकडे चांगली कमाई केली. हरामखोर, लिपस्टिक अंडर माय बुरखा, न्यूटन, ट्रॅप्ड, बरेली की बर्फी अशा सिनेमांनी चांगली कमाई केली. छोट्या बजेटच्या सिनेमांनाही लोकांनी उचलून धरलं. त्यामुळे हिंदी इंडस्ट्रीच्या अंगी जरा बळ आलं. यात मोठा फटका बसला तो ट्युबलाईटला. सलमानचा हा सिनेमा सपशेल पडला.  याशिवाय आवर्जून उल्लेख करावा अशा काही सिनेमांनीही आपली दखल घेणं भाग पाडलं. यातली नावं अशी, हिंदी मीडियम, सचिन अ बिलियन ड्रीम्स, मॉम, जब हॅरी मेट सेजल आदी सिनेमांनी आपली उपस्थिती दाखली. तर राजकुमार राव अभिनित आणि अमित मसूरकर दिग्दर्शित न्यूटनने ऑस्कर शर्यतीत भारताची अधिकृत एट्री म्हणून स्थान मिळवलं.
सिनेमे येत जात असतात पण 2017 मध्ये चर्चा होती ती पद्मावतीची. संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने मात्र मोठा गहजब झाला. रजपूत सेनेसह अनेक ठिकाणी या चित्रपटाविरोधात निदर्शनं करण्यात आली. भन्साळी यांना मारहाणही झाली. दीपिका पदुकोन, रणवीर सिंग यांना मारण्याच्या धमक्याही आल्या. पद्मावती पूर्ण झाला खरा. पण तो या वर्षात रिलीज होऊ शकला नाही. सेन्सॉरने नियमांची आठवण करून दिली आणि हे वर्षं संपता संपता संपूर्ण सिनेसृष्टीला ब्रेक लागला. असाच वादंग मधुर भंडारकरच्या इंदू सरकारलाही झाला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी या सिनेमाविरोधात जोरदार निदर्शनं केली.
पहलाज गॉन.. प्रसून इन 
या वर्षाने सेन्सॉर बोर्डालाही पुरेसं झोडपून काढलं. सिनेमाला सुचवले जाणारे कटस, त्यावरून होणारे वादंग, पहलाज निहलानी यांची वक्तव्य यामुळे मीडियाने निहलानी यांना चांगलंच घेरलं. हरामखोरपासून सुरू झालेला हा सिलसिला हॅरी मेट सेजलपर्यंत चालला आणि नाकापेक्षा मोती जड होतो आहे हे लक्षात आल्यानंतर निहलानी यांची बदली झाली आणि तिथे प्रसून जोशी हे गीतकार आले. तरी सेन्सॉरच्या कामात फार फरक पडलाय अशातला भाग नाही. कारण सरकारने घालून दिलेल्या नियमानुसारच ते बोर्ड काम करणार हे ओघाने आलं.
सरकारी दडपशाहीचा फटका 
सरकारी दडपशाहीचा मोठा फटका एस दुर्गा आणि न्यूड सारख्या सिनेमांना बसला. गोव्यातल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एस दुर्गा आणि न्यूड यांची निवड होऊनही हे चित्रपट तिथे दाखवले गेले नाहीत. न्यूडला तर त्याहून मोठा फटका बसला. म्हणूनच केरळ महोत्सवातही वेळेत या चित्रपटाला सेन्सॉर मिळालं नाही. माहिती प्रसारण मंत्रालयाने हस्तक्षेप करत हा चित्रपट तिथे दाखवला जाऊ नये अशी तजवीज केली.
एकूणात, 2017 हे वर्ष हिंदी सिनेमासाठी महत्वाचं ठरलं. दंगलचा जोश कायम असतानाच रईस आणि काबील आले त्यानंतर वेळोवेळी छोट्या बजेटचे सिनेमे आले आणि ते चालले. त्यामुळे हिंदी नेहमीप्रमाणे टवटवी होती. शिवाय 2018, 19 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचे मुहूर्तही याच वर्षात झाले. ठग्ज ऑफ हिंदुस्थान, भारत यांपासून साहोपर्यंतची चर्चा झडली ती याच वर्षात. 2018 हे सालही हिंदी सिनेमासाठी महत्वाचं असणार यात शंका नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Maharashtra Vidhansabha Election 2024 : महायुतीला खटाखट मतं मिळाली, मविआला प्रचंड मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता
महायुतीला खटाखट मतं मिळाली, मविआला प्रचंड मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता
Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Maharashtra Vidhansabha Election 2024 : महायुतीला खटाखट मतं मिळाली, मविआला प्रचंड मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता
महायुतीला खटाखट मतं मिळाली, मविआला प्रचंड मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता
Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
Shivsena Thackeray Vs Shinde Camp: एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
Mumbai Vidhan Sabha Result 2024: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? महायुती आघाडीवर, मविआ टेन्शनमध्ये
मोठी बातमी: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? भाजप-शिंदे गटाची मोठी आघाडी, मविआ टेन्शनमध्ये
Embed widget