Yash 19 Title Announcement Date : दाक्षिणात्य सुपस्टार यश (Yash) सध्या चर्चेत आहे. यशने 'केजीएफ 2' (KGf 2) या ब्लॉकबस्टर सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. 'केजीएफ 2' या सिनेमानंतर यश कोणत्याही सिनेमात झळकला नाही. आता यशच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे. 


'यश 19'च्या टायटलची होणार घोषणा


'केजीएफ 2' या सिनेमानंतर अभिनेत्याचं नाव 'यश 19'सोबत जोडलं गेलं. यशच्या करिअरमधला हा 19 वा सिनेमा आहे. आता केजीएफबद्दल एक नवी अपडेट समोर आली आहे. निर्माते 'यश 19'च्या टायटलची घोषणा करण्यास सज्ज आहेत. 8 डिसेंबरला निर्माते 'यश 19'च्या टायटलची घोषणा करणार आहेत. 


यशच्या आगामी सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुरा गीतू मोहनदास सांभाळणार आहे. केवीएन प्रोडक्शनच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे. 'यश 19' या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या सिनेमाची उत्सुकता काय असेल हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या सिनेमात यशचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे. 






यशच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे. यशच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनीदेखील कमेंट्सचा वर्षाव केला आहे. यशचा आगामी सिनेमा बॉक्स ऑफिसवर वादळ आणणार असे म्हटले जात आहे.  जगभरातील यशचे चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. हा मास अॅक्शन सिनेमा असल्याचं म्हटलं जात आहे. या सिनेमाची गोष्ट ड्रग माफिया सिस्टमवर आधारित असणार असल्याचं म्हटलं जात आहे.


यशच्या सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता


दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये यशची गणना होते. केजीएफ आणि केजीएफ 2 या सिनेमांमुळे यश पॅन इंडिया स्टार झाला आहे. 'केजीएफ 2' या सिनेमानंतर यश शांत होता. आता अभिनेत्याच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या पोस्टवर डिसेंबर शानदार असणार आहे, आणखी एक 100 कोटींचा सिनेमा, संपूर्ण देश प्रतीक्षा करत आहे, रॉकी भाई सलाम, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. यशच्या अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली आहे. आता अभिनेत्याच्या आगामी सिनेमांची प्रतीक्षा आहे.


संबंधित बातम्या


Yash : केजीएफ फेम यशनं आयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी दिलं 50 कोटींचं दान? व्हायरल होणाऱ्या फोटोचं सत्य काय?