Salman Khan Tiger 3 OTT Release : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचा 'टायगर 3' (Tiger 3) हा सिनेमा 12 नोव्हेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून आता हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. 'टायगर 3' हा सिनेमा ओटीटीवर जादू दाखवण्यात कमी पडला होता. पण आता ओटीटीवर हा सिनेमा किती धमाका करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


'टायगर 3' या सिनेमातील सलमान खान आणि कतरिना कैफची रोमँटिक केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली. तर इमरान हाशमीने या सिनेमात खलनायकाची भूमिका साकारली होती. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. जगभरात या सिनेमाने 450 कोटींची कमाई केली. तर भारतीय बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 300 कोटींची कमाई केली होती. आता रिलीजच्या 21 दिवसांनंतर हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.






'टायगर 3' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मनीष शर्मा (Manish Sharma) यांनी सांभाळली आहे. आता लवकरच हा बहुचर्चित सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार,'टायगर 3' हा सिनेमा महिनाभरानंतर अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. वायआरएफ स्पाय यूनिवर्सचा हा पाचवा सिनेमा आहे. 2017 मध्ये 'टायगर जिंदा है' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात शाहरुख खानची झलक पाहायला मिळाली होती.


शाहरुखचा 'पठाण' (Pathaan) आणि 'जवान' (Jawan) या दोन्ही सिनेमांनी सिनेमागृहात धुमाकूळ घालण्यासोबत ओटीटीवरदेखील धमाका केला आहे. त्यामुळे आता सलमान खानचा 'टायगर 3' हा सिनेमा ओटीटीवर किती धमाका करणार हे पाहावं लागेल. 


'टायगर 3'पेक्षा 'अॅनिमल'ला प्रेक्षकांची पसंती


रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' या सिनेमापेक्षा सलमान खानच्या 'टायगर 3' या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 1 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित झालेले 'अॅनिमल' आणि 'सॅम बहादुर' हे दोन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. बॉक्स ऑफिसवर या दोन्ही सिनेमांनी चांगला गल्ला जमवला आहे. सलमानच्या 'टायगर 3'पेक्षा या सिनेमांनी चांगली कमाई केली आहे. 


संबंधित बातम्या


Salman Khan : सलमानचा 'Tiger 3' फ्लॉप की सुपरहिट? भाईजान म्हणतो,"दिवाळी आणि वर्ल्डकप फायनलचा सिनेमावर परिणाम"