Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. सध्या ते 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशातच बिग बी यांनी शेअर केलेल्या एका फोटोने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अमिताभ बच्चन यांनी एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी 'जलसा'बाहेर (Jalsa) तुफान गर्दी केली होती. बिग बींनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.


अमिताभ बच्चन यांची खास पोस्ट (Amitabh Bachchan Post)


अमिताभ बच्चन यांनी 'जलसा'बाहेर चाहत्यांची गर्दी असलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"ताऊ, नाना को चली है पीढी, देखने जलसा गेट पर; ये फाटक पर क्या गुल खिला है, देखें हम भी चलकर, ये भीड जमा क्यों होती है, आँखे चकित यूँ घूरें, अम्मा गोदी, भागे भैया, नाना को दूर ही रक्खें". अमिताभ बच्चन यांची ही पोस्ट चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. या पोस्टवर अमिताभ बच्चन काहीही करू शकतात, बिग बी, आम्हालाही तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे, किती छान, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 






अमिताभ बच्चन यांनी पोस्ट शेअर करत दोन फोटोदेखील शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांचा मुलगा अर्थात अभिषेक बच्चन एका छोट्या मुलाचा हात पकडून चालताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये बिग बींसह त्यांना भेटायला आलेले चाहते दिसत आहेत. या पोस्टवर चाँद सी चमक, दिल रहे सदा दमक, दिव्य कीर्तिमान, तुम्ही देशाची जान आहात, तुमच्यासारखे तुम्हीच.. तुम्ही कमाल आहातच..आणि कमाल पोस्टही लिहिली आहे". अभिषेक बच्चनसोबत असलेला मुलगा कोण हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. 


अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेला मुलगा हा नैना बच्चन यांचा मुलगा आहे. नैना ही अमिताभ यांचा लहान भाऊ अजिताभ बच्चन यांची मुलगी आहे. बिग बी यांचा 'कल्फि 2898 AD' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बींच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी 'KBC 15'च्या मंचावर सूनबाई ऐश्वर्यासाठी केलं 'हे' खास काम; चाहत्यांनी केलं बिग बींचं कौतुक