Bharti Singh : कॉमेडी क्वीन भारती सिंहने (Bharti Singh) चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. भारतीच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. भारतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलगा झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. 


भारती सिंह प्रेग्नेंसीच्या शेवटच्या दिवसातही काम करत होती. छोट्या पाहुण्याच्या आगमनाने भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया खूश झाले आहेत. भारती सिंह गेले अनेक दिवस तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत होती. भारतीने यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ शेअर करत गरोदरपणाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.





भारतीला एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, 'जुळी मुलं होणार आहेत का?' या प्रश्नाला भारतीनं उत्तर दिलं होतं, 'मला एकचं मुल होणार आहे. फक्त हे नाही माहित की मुलगा होणार आहे की मुलगी. हर्षला लहान मुलं खूप आवडतात. आम्ही दोघेही खूप एक्सायटेड आहोत'.


संबंधित बातम्या


RRR : राम चरण आणि ज्युनियर एनटीआरचा 'आरआरआर' आता मोडणार 'बाहुबली 2' चा रेकॉर्ड


Ranbir Alia Wedding : आलिया-रणबीर 'या' महिन्यात घेणार सात फेरे


Mazya Navryachi Bayako : 'माझ्या नवऱ्याची बायको' आता येणार हिंदीत, प्रोमो आऊट


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha