Yaariyan 2: यारियां हा चित्रपट 2014 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. आता या चित्रपटाच्या सिक्वेलची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. यारियां 2  (Yaariyan 2)  हा चित्रपट रिलीज होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडला आहे.  शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती (SGPC)  यांनी  यारियां 2 या चित्रपटामधील एका गाण्यामधील सीनवर आक्षेप घेतला आहे.


शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती (SGPC) यांनी यारियां 2 या चित्रपटाच्या 'सौरे घर' या गाण्यातील एका दृश्यात किरपाणचा आक्षेपार्ह वापर केल्याचा आरोप चित्रपटांच्या निर्मात्यांवर केला आहे. आता चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी याबाबत स्पष्टीकरणही दिले आहे.


SGPC च्या ट्विटर अकाऊंटवर एक ट्वीट शेअर करण्यात आले आहे. या ट्वीटमध्ये लिहिलं आहे, 'राधिका राव आणि विनय सप्रू दिग्दर्शित 'यारियां 2' चित्रपटातील 'सौरे घर' या गाण्यात दाखवण्यात आलेल्या या दृश्यांवर आमचा तीव्र आक्षेप आहे. अभिनेत्याने अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने शीख काकार (शीख धर्माचे प्रतीक) किरपाण घातलेला दिसत आहे, जो स्वीकारला जाऊ शकत नाही. यामुळे जगभरातील शीख समुदायाच्या धार्मिक भावना गंभीरपणे दुखावल्या जात आहेत.' 






SGPC च्या या ट्वीटमध्ये 'सौरे घर' गाण्यामधील काही सीन्सचा फोटो देखील शेअर करण्यात आला आहे. आता 'यारियां 2' या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.


SGPC च्या ट्विटनंतर दिग्दर्शक  राधिका राव आणि विनय सप्रू यांनी एक ट्वीट शेअर केले आहे. यामध्ये लिहिलं आहे की, 'आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की गाण्यात अभिनेत्याने किरपाण नाही तर खुकरी घातली आहे. खरं तर, चित्रपटातील संवाद देखील हे स्पष्ट करतात की, ते खुकरी आहे. कोणताही गैरसमज झाला असेल तर आम्ही दिलगीर आहोत. आमचा हेतू कोणत्याही धार्मिक श्रद्धा दुखावण्याचा किंवा अनादर करण्याचा कधीच नव्हता.'






यारियां 2 या चित्रपटामध्ये दिव्या खोसला कुमार, मीझान जाफरी आणि पर्ल व्ही पुरी हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या:


Yaariyan 2 Poster : सिक्वेलचा धडाका सुरुच! नव्या कलाकारांसह ‘यारियां’चा सिक्वल येणार प्रेक्षकांच्या भेटीला