Marathi Bhavageete:  संगीत हा माणसाच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे.  सध्या अनेक जण डिप्रेशनचा सामना करत आहेत. हे डिप्रेशन घालण्यासाठी अनेक जण म्युझिक थेरपी घेतात. मनात असणारा दु:खाचा डोंगर नाहीसा करण्याची ताकद संगीतात असते. 21 जून रोजी जगभरात जागतिक संगीत दिन  (World Music Day 2023) साजरा केला जातो. अनेकवेळा संगीताच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या जातात. कविता जेव्हा गीत होते, तेव्हा भावगीत तयार होते. जागतिक संगीत दिनानिमित्त जाणून घेऊयात मराठी भावगीतांच्या (Marathi Bhavageete) समृद्ध विश्वाबद्दल...


मराठी भावगीते ही मनाला भिडणारी असतात, असं अनेकांचे मत आहे. जी.एन. जोशी  हे मराठीतले आद्य भावगीत गायक आहेत, असं म्हटलं जातं.  भावगीत हा सुगम संगीताचा एक प्रकार आहे. गजानन वाटवे यांनी भावगीते घरांघरांत पोहोचवली. शांता शेळके, विंदा करंदीकर, जगदीश खेबुडकर, मंगेश पाडगावकर या कवींचे शब्द आणि यशवंत देव,सुधीर फडके, अशोक पत्की या संगीतकारांच्या संगीतानं  मराठी भावगीतांचे विश्व समृद्ध झाले आहे. पहाडी, भैरवी यांसारख्या विविध रागांमध्ये ही भावगीते गायली जातात. जाणून घेऊयात काही प्रसिद्ध मराठी भावगीतांबाबत...


केशवा माधवा हे भावगीत रमेश अणावकर यांनी लिहिलं आहे. या भावगीताला दशरथ पुजारी यांनी संगीत दिले असून सुमन कल्याणपूर यांनी ते गायलं आहे. प्रेमस्वरूप आई हे भावगीत लता मंगेशकर यांनी गायलं आहे.दत्ता डावजेकर यांनी या भावगीताला संगीत दिले आहे. प्रेमस्वरूप आई हे भावगीत प्रसिद्ध कवी माधव ज्युलियन यांनी लिहिलं आहे.  तुझ्या गळा माझ्या गळा हे भावगीत लहान मुलांचे आवडते आहे. हे गीत सुधीर फडके, आशा भोसले यांनी गायले आहे तर वसंत प्रभू यांनी या भावगीताला संगीत दिले आहे. 


क्षणभर उघड नयन देव, हरवले ते गवसले का, श्रीरामा घनश्यामा, विकत घेतला श्याम, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे,  ही मराठी भावगीते देखील लोक आवडीनं ऐकतात.


जागतिक संगीत दिनाबद्दल जाणून घ्या


दरवर्षी 21 जून रोजी जागतिक संगीत दिन साजरा केला जातो. जागतिक संगीत दिनाला (World Music Day 2023) Fete de la Musique असंही म्हटलं जातं. 1982 मध्ये जागतिक संगीत दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


World Music Day 2023: आर डी बर्मन ते अमित त्रिवेदी; 'हे' आहेत भारतीय संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक