Manoj Muntashir: 'आदिपुरुष' (Adipurush) या बिग बजेट चित्रपटाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. 16 जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. काही नेटकऱ्यांनी या चित्रपटाचं कौतुक केलं तर काही लोक या चित्रपटाला ट्रोल करत आहेत. आदिपुरुष या चित्रपटातील डायलॉग्सवर देखील अनेकांनी टीका केली. आता आदिपुरुष या चित्रपटाचे संवाद लेखल मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) यांना मुंबई पोलिसांनी सुरक्षा दिली आहे.
आदिपुरुष चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली. आपल्या जीवाला धोका असल्याची भीती मनोज यांनी पोलिसांकडे व्यक्त केली आहे. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी मनोज मुंतशीर यांना सुरक्षा दिली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
'आदिपुरुष' या चित्रपटातील संवाद आणि कलाकारांच्या लूकवर काही लोकांनी टीका केली. या चित्रपटातील हनुमानाच्या डायलॉगवर देखील अनेकांनी आक्षेप घेतला. चित्रपटातील हनुमानाच्या या डायलॉगबाबत मनोज म्हणाले की, 'आजकालचे लोक या डायलॉगसोबत जोडले जावेत म्हणून जाणूनबुजून तो डायलॉग तसा लिहिला आहे. ही गोष्ट सामान्य भाषेत सांगितली आहे.फक्त हनुमानजीबद्दलच का बोलले जात आहे? भगवान श्रीरामांच्या संवादांवरही बोलले पाहिजे. माता सीतेच्या डायलॉगबद्दल देखील बोललं गेलं पाहिजे.
अभिनेता प्रभासनं आदिपुरुष या चित्रपटात प्रभू श्रीरामाची भूमिका साकारली 'आहे तर अभिनेत्री कृती सेनननं या चित्रपटात सीता ही भूमिका साकारली आहे. ओम राऊतनं आदिपुरुष या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आदिपुरुष हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
मनोज मुंतशीर हे गीतकार, कवी आणि पटकथा लेखक आहेत. त्यांनी अनेक हिट हिंदी चित्रपटातील गाण्यांचे लेखन केले. तेरी मिट्टी, तेरे संग यारा, कौन तुझे या गाण्यांचे लेखन मनोज यांनी केले आहे. मनोज मुंतशीर यांनी आदिपुरुष या चित्रपटातील संवादांचे लेखन केलं आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: