World Cup 2023:   विराट कोहलीने (Virat Kohli) विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात अनेक विक्रम केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात विराट कोहलीने 85 धावांची झुंजार खेळी केली. विराट कोहलीने 116 चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने 85 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात  टीम इंडियाचा विजय झाल्यानंतर आता अनुष्का शर्मानं (Anushka Sharma) विराटचा खास फोटो शेअर करुन आनंद व्यक्त केला आहे.


अनुष्कानं इन्स्टग्रामवर आयसीसीच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या विराटचा फोटो पोस्ट केला आहे. अनुष्कानं या फोटोसोबत ब्लू हार्ट इमेजी देखील शेअर केला आहे. अनुष्कानं शेअर केलेल्या फोटोमध्ये केएल राहुल (KL Rahul) देखील दिसत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून  अनेकांनी विराट कोहली आणि टीम इंडियाला विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.




केएल राहुल आणि विराट कोहली यांची दीडशतकी भागिदारी झाली आहे. विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरोधातील ही आतापर्यंतची सर्वोत्तम भागिदारी आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यात विराट आणि केएल राहुल यांच्या झुंजार खेळीचं अनेकजण कौतुक करत आहेत. 


अनुष्का शर्माच्या प्रेग्नंसीची चर्चा 


विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा ही जोडी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. विराट आणि अनुष्का हे दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहे, असं म्हटलं जात आहे. अनुष्का ही दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु होती. काही दिवसांपूर्वी अनुष्का आणि विराट यांना मॅटर्निटी क्लिनिकच्या बाहेर पापाराझींनी स्पॉट केले होते, पण दोघांनीही पापाराझींना फोटो लीक न करण्याची विनंती केली होती.   याच कारणामुळे आता विराट आणि अनुष्का यांच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचे आगामन होणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली.  






2017 मध्ये अनुष्कानं विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. जानेवारी 2021 मध्ये अनुष्कानं मुलीला जन्म दिला. तिचे नाव वामिका असं आहे. आता अनुष्का ही दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. पण याबाबत अजून विराट  आणि अनुष्कानं कोणतीही माहिती चाहत्यांना दिलेली नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Anushka Sharma Post: ‘वर्ल्ड कपची तिकिटं.." विराट कोहलीची मजेशीर पोस्ट; अनुष्का म्हणाली, 'मेसेजला रिप्लाय दिला नाही तर...'