Womens Equality Day 2022 : कायद्याने महिलांना महिलांना अनेक अधिकार प्रदान करण्यात आले. यापैकीच एक होता मतदानाचा अधिकार. 26 ऑगस्ट 1920 साली महिलांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळाला. याच दिवसाच्या स्मरणार्थ जगभरात 26 ऑगस्ट या दिवशी महिला समानता दिवस (Women's Equality Day) साजरा केला जातो. कायद्याने स्त्री आणि पुरुषांना समान हक्क दिले असले, तरी प्रत्यक्षात मात्र याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. अनेक ठिकाणी आजही स्त्रीयांना त्यांच्या हक्कांची आणि अधिकाराची माहितीही नसते. तर, अनेक ठिकाणी आजही महिला पुरुषांच्या अधिकाराच्या बोलात अडकलेल्या दिसतात. मात्र, काही ठिकाणी या उलट परस्थिती देखील पाहायला मिळते. काही कुटुंबांनी स्त्री-पुरुष समानता ही केवळ कागदावरच ठेवलेली नाही तर, ती प्रत्यक्ष आयुष्यातही अंगीकारली आहे. मागील काही काळात बॉलिवूडमध्येही स्त्री-पुरुष समानतेवर भाष्य करणारे चित्रपट पाहायला मिळत आहेत. जाणून घेऊया अशाच काही चित्रपटांबद्दल...


कि अँड का (Ki & Ka)


अर्जुन कपूर आणि करीना कपूर-खान अभिनित ‘कि अँड का’ हा चित्रपट एक वेगळी आणि हटके कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पुरुष काम करून पैसा कमवणार आणि महिला घरात बाकीची कामं पाहणार, या ट्रेंडला चित्रपटाने फाटा दिला. या चित्रपटातील नायिका नोकरी करते, तर नायक स्वतःहून घरकाम आणि मुलंबाळं सांभाळण्याची जबाबदारी घेतो.


इंग्लिश-विंग्लिश (English Vinglish)


या चित्रपटात श्रीदेवीने ‘शशी’चे पात्र जगासमोर उत्तरं उदाहरण म्हणून मांडले. एक स्त्री अतिशय जिद्दीने घराबाहेर पडून स्वतःला सिद्ध कशाप्रकारे सिद्ध करू शकते,  हे या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात श्रीदेवीने अतिशय सशक्तपणे ही भूमिका साकारली होती.


दंगल (Dangal)


'दंगल' हा बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटात महावरी सिंह फोगट यांनी आपल्या मुलींना कुस्तीच्या आखाड्यात कशा प्रकारे उतरवले याची कथा दाखवली आहे. 'दंगल'मध्ये ज्या पद्धतीने या मुलींनी मुलांच्या खेळात उतरून सगळ्या स्पर्धांमध्ये बाजी मारतात. यात त्यांच्या वडिलांनी आपल्या मुलींना पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली आहे. समाजासाठी हा खरोखरच धडा आहे.


मर्दानी (Mardaani)


‘मर्दानी’ या चित्रपटात राणी मुखर्जीने महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर जाणवते की, स्त्री मानसिक आणि शारीरिक दोन्ही दृष्ट्या किती मजबूत असू शकते. यासोबतच अन्याय करणाऱ्यांना धडा कसा शिकवायचा, हेही तिला माहीत आहे. यात तिने एका सशक्त महिला पोलिसाची अधिकाऱ्याची प्रतिमा अतिशय प्रभावीपणे दाखवली आहे.


गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल (Gunjan Saxena: The Kargil Girl)


जान्हवी कपूर अभिनित या चित्रपटात ‘गुंजन सक्सेना’ यांची कथा दाखवली आहे. गुंजन या भारतीय हवाई दलातील पहिल्या महिला वैमानिक आहेत. गुंजन सक्सेना या कारगिल युद्धाचा एक महत्त्वपूर्ण भाग होत्या. 1999मध्ये झालेल्या या युद्धात त्यांनी युद्धक्षेत्रातून जखमी झालेल्या सैनिकांना बाहेर काढले होते. गुंजन आणि फ्लाइट लेफ्टनंट श्रीदिव्या राजन यांनी अनेक आव्हानांचा सामना केला, परंतु त्या मागे हटल्या नाहीत. गुंजन यांना त्यांच्या शौर्याबद्दल ‘शौर्य चक्र’ही मिळाले.


हेही वाचा :


Women's Equality Day : का साजरा केला जातोय महिला समानता दिन? महिला समानतेचा इतिहास काय आहे?