एक्स्प्लोर

कधीही राजकारणात जाणार नाही : आमिर खान

कधीही राजकारणात जाणार नसून त्यापासून लांब राहणार असल्याचं पाणी फाऊंडेशनचे संयोजक आणि सिनेअभिनेता आमिर खान यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं.

पुणे : गेल्या 30 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करत असल्याने राजकीय मंडळींशी चांगले संबंध आहेत. मात्र कधीही राजकारणात जाणार नसून त्यापासून लांब राहणार असल्याचं पाणी फाऊंडेशनचे संयोजक आणि सिनेअभिनेता आमिर खान यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं. पुण्यात पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला अनेक राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. कोणत्याही राजकीय व्यासपीठावर जाऊ नका, महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आमिर खान यांना दिला होता. राजकारणात असल्यावरच सामाजिक क्षेत्रात काम करता येतं, असं नाही. राजकारणाच्या बाहेर राहूनही चांगलं काम करता येतं, असं आमिर यांनी सांगितलं. चांगल्या कामाच्या जोरावर राज्यसभेवर जाणार का? या प्रश्नावर आमिर खान यांनी भूमिका मांडली. महाराष्ट्रामध्ये पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून काम शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणार आहे. त्यासाठी प्रत्येक घटकाला सामावून घेणार आहे. हे सर्व घटक एकत्र आल्यास लवकरच महाराष्ट्र पाणीदार होईल. त्याचबरोबर पाणी फाऊंडेशन पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीमुळे टीम एक वर्षांसाठी ब्रेक घेण्याच्या तयारीत होती. मात्र तसं आम्ही करणार नसून अधिक चांगलं काम करणाऱ्यावर भर देणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली. जलसंधारणासाठी महाराष्ट्राची निवड करण्यामागील कारणही आमिर खान यांनी सांगितलं. देशातील इतर राज्यात जलसंधारणाचे काम चांगले असून त्यात मी महाराष्ट्रीयन असल्याने आपल्या राज्यात जलसंधारणाचे काम करण्याचे ठरवले. आज या कामाला तीन वर्ष पूर्ण झाले. त्या कामावर समाधानी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तर या कामामध्ये आधिकाधिक तरुणांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केलं. वॉटर कप स्पर्धेचा निकाल प्रथम क्रमांक - टाकेवाडी (आंधळी) ता. माण, जी सातारा 75 लाख आणि ट्रॉफी द्वितीय क्रमांक - भांडवली, (ता.माण, जी. सातारा) आणि सिंदखेड (ता. मोताळा जी. बुलडाणा) प्रत्येकी 25 लाख आणि ट्रॉफी तृतीय क्रमांक - आनंदवाडी (ता.आष्टी, जि. बीड) आणि उमठा (ता. नरखेड, नागपूर) प्रत्येकी 10 लाख आणि ट्रॉफी संबंधित बातम्या : महाराष्ट्र 'पाणीदार' करणाऱ्या वॉटर कप स्पर्धेचा निकाल जाहीर एकाच व्यासपीठावर राज ठाकरेंचा अजित पवारांवर निशाणा

महत्त्वाच्या बातम्या

Praveen Tarde On Snehal Tarde: 'माझ्या पुढच्या कोणत्याच सिनेमात ती नसेल...'; 'देऊळ बंद 2'मध्ये गाजल्यानंतरही पत्नी स्नेहल तरडेला कास्ट करणार नाहीत, प्रवीण तरडेंनी कारण सांगितलं
'माझ्या पुढच्या कोणत्याच सिनेमात ती नसेल...'; 'देऊळ बंद 2'मध्ये गाजल्यानंतरही पत्नी स्नेहल तरडेंबाबत प्रवीण तरडेंचं मोठं वक्तव्य
Actor Sanjeeb Singh Dies Of Heart Attack: 13 तासांचं वर्किंग शेड्यूल, शुटिंगवेळीच अस्वस्थ वाटू लागलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
13 तासांचं वर्किंग शेड्यूल, शुटिंगवेळीच अस्वस्थ वाटू लागलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
Bollywood Song Story: माचिसच्या बॉक्सवर लावली चाल, सिगारेटच्या पाकिटावर लिहिले गेले बोल; 65 वर्षांनंतरही दिग्गजांनी रचलेल्या 'या' गाण्याची क्रेझ कायम
माचिसच्या बॉक्सवर लावली चाल, सिगारेटच्या पाकिटावर लिहिले गेले बोल; 65 वर्षांनंतरही दिग्गजांनी रचलेल्या 'या' गाण्याची क्रेझ कायम
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Ghadi : दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
Sachin Ahir on Omraje Nimbalkar: टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
NCP on Chief Minister Post: 'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
Rahul Dravid Coach : ब्रँडन मॅक्क्युलम OUT, राहुल द्रविड IN?, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मोठी खेळी; 'द वॉल' होणार कसोटी संघाचा मुख्य कोच?
ब्रँडन मॅक्क्युलम OUT, राहुल द्रविड IN?, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मोठी खेळी; 'द वॉल' होणार कसोटी संघाचा मुख्य कोच?
Beed News: आमचे लग्न होईना, पाऊस पडत नाही, आमची सरसकट कर्जमाफी करा; शेतकऱ्याचा कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंना फोन
आमचे लग्न होईना, पाऊस पडत नाही, आमची सरसकट कर्जमाफी करा; शेतकऱ्याचा कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंना फोन
Bollywood Song Story: माचिसच्या बॉक्सवर लावली चाल, सिगारेटच्या पाकिटावर लिहिले गेले बोल; 65 वर्षांनंतरही दिग्गजांनी रचलेल्या 'या' गाण्याची क्रेझ कायम
माचिसच्या बॉक्सवर लावली चाल, सिगारेटच्या पाकिटावर लिहिले गेले बोल; 65 वर्षांनंतरही दिग्गजांनी रचलेल्या 'या' गाण्याची क्रेझ कायम
Jejuri Varkari Accident: मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, ज्ञानोबा माऊलींच्या पालखीतील दुर्दैवी घटना
मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, 15 वारकरी जखमी
Kolhapur Crime News: 1 महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच आईने मृत्यूला कवटाळले; घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापुरात हादरवणारं घडलं
1 महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच आईने मृत्यूला कवटाळले; घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापुरात हादरवणारं घडलं
Embed widget