The Kashmir Files : 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा सिनेमा मार्च 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. काश्मीरात पसरलेला आतंकवाद आणि भयानक दहशतीवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. हा सिनेमा रिलीज होण्याआधीच जम्मूमध्ये काश्मिरी पंडितांसाठी या सिनेमाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. सिनेमा पाहिल्यानंतर जम्मूवासियांचे डोळे पानावले. 

Continues below advertisement


जम्मूमध्ये आजोजित केलेल्या स्पेशल स्क्रीनिंग दरम्यान प्रेक्षकांना अश्रू अनावर झाले. या सिनेमाच्या निर्मात्यांनी दावा केला आहे की, 'द काश्मीर फाइल्स' हा सिनेमा काश्मिरी पंडितांच्या वेदना प्रेक्षकांसमोर आणेल. तर या सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री म्हणाले,"काश्मीर नरसंहाराची कथा मोठ्या पडद्यावर आणणे सोपे काम नव्हते. त्यामुळे अत्यंत संवेदनशीलतेने ते हाताळावे लागले".





सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंग दरम्यान दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्रीसह सिनेमातील कलाकार आणि राजकारणी उपस्थित होते. या सिनेमात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर प्रेक्षकांनी दिग्दर्शकाचेदेखील कौतुक केले. 


संबंधित बातम्या


Attack New Poster : जॉन अब्राहम 'अटॅक'साठी सज्ज, ट्रेलर 'या' दिवशी होणार आऊट


Jhund Box Office Collection Day 2 : ‘झुंड’ची यशस्वी घौडदौड सुरूच! दुसऱ्या दिवशीही गाठला ‘इतक्या’ कोटींचा टप्पा!


Bhuban Badyakar : ‘कच्चा बदाम’नंतर नवा कारनामा, स्वतःच्याच अपघातावर भुवन बड्याकरने तयार केलं गाणं!


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha