Saba Azad : अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत भाग बनला आहे. मीडिया रिपोर्टनुसार हृतिक रोशन अभिनेत्री-गायिका सबा आझादला डेट करत आहे. दोघेही अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसतात. या दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत मौन बाळगले आहे. हृतिकच्या कुटुंबालाही सबा खूप आवडते आणि ती देखील त्यांची काळजी घेते.


नुकतीच सबा आजारी पडली, तेव्हा हृतिकच्या कुटुंबीयांनी तिची विशेष काळजी घेतली. आता सबाने एक फोटो शेअर केला असून, हृतिकची चुलत बहीण पश्मीनाने तिच्या या फोटोवर कमेंट केली आहे.


अभिनेत्री सबा आझाद नुकतीच ‘रॉकेट बॉईज’ या वेब सिरीजमध्ये झळकली होती. तिने या वेब सिरीजमधील तिच्या लूकचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत ती पीच कलरच्या साडीत दिसत आहे. तिचा हा लूक खूपच क्यूट दिसत आहे. फोटो शेअर करताना सबाने लिहिले – ‘मिस. परवाना इराणी. सिरसा 1942.’ हृतिकची चुलत बहीण पश्मीनाने सबाच्या या फोटोवर कमेंट केली आहे.



पश्मीनाची कमेंट चर्चेत


राजेश रोशनची मुलगी पश्मीना रोशनने सबाच्या फोटोवर ‘Ufff’ आणि हार्ट इमोजी पोस्ट केली आहे. पश्मीनाच्या कमेंटनंतर सबानेही प्रतिक्रिया दिला आहे. तिने किसिंग फेस इमोजी पोस्ट केला आहे. हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशनच्या मुलीनेही सबाच्या फोटोवर कमेंट केली आहे.


नुकतीच सबाची प्रकृती खालावली होती. यावेळी हृतिकच्या कुटुंबीयांनी तिच्यासाठी घरी बनवलेले जेवण पाठवले होते. सबाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर जेवणाचा फोटो शेअर केला होता.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha